शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अमृतपाल, पापलप्रीत सिंगचा पुन्हा गुंगारा, पोलिसांना लागला होता सुगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2023 7:52 AM

दोघे वेगवेगळ्या दिशेने पळाले...

लाेकमत न्यूज नेटवर्क, अमृतसर: फुटीरवादी अमृतपाल सिंग याच्यासोबत सावलीसारखा राहणारा पापलप्रीत सिंग वेगवेगळ्या दिशेने पळाले. अमृतपालच्या पलायनात त्याने मोठी भूमिका बजावली. होशियारपूरमध्ये पोलिसांनी वेढा घातल्यानंतर पापलप्रीत जोगा सिंगसोबत एका दिशेला तर अमृतपाल कारचालकासोबत दुसऱ्या दिशेला पळून गेला होता.

अमृतपाल आणि पापलप्रीत सिंग हे होशियारपूरमध्ये एका वाहिनीला मुलाखत देणार होते. मात्र, पोलिसांना याचा सुगावा लागला. पोलिस मागावर असल्याचे लक्षात येताच अमृतपालच्या साथीदारांनी त्यांची कार मार्नियान गावातील गुरुद्वाराकडे नेली. तेथेही पोलिसांनी चहूकडून घेरल्याचे पाहून सर्वांनी गाडी तेथेच सोडून पळ काढला. पोलिसांना चुकीचे लोकेशन मिळावे म्हणून अमृतपालने त्याचा मोबाइल जोगा सिंगला दिला. त्यानंतर तो कारचालक चरणजित सिंग याच्यासोबत एका दिशेला तर पापलप्रीत सिंग व जोगा सिंग दुसऱ्या दिशेला पळाले. पापलप्रीत सिंग व जोगा सिंग यांनी रात्री होशियारपूरमधील एका डेऱ्यात आश्रय घेतला. तेथील पापलप्रीत सिंगचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज २९ मार्चच्या सकाळचे आहे. रात्रीच्या मुक्कामानंतर दोघे सकाळी लुधियानातील साहनेवाल शहराकडे रवाना झाले. पोलिसांनी लोकेशनच्या आधारे जोगा सिंगला तेथे अटक केली तर पापलप्रीत येथेही पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी झाला.

जत्थेदारांनी बोलावली शीख पत्रकारांची बैठक

अमृतपालविरुद्धच्या कारवाईदरम्यान अनेक पत्रकारांचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले होते. अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी याबाबत पत्रकारांची विशेष बैठक बोलावली आहे. बैठकीत पत्रकारांविरोधात सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा होणार आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दमदमा साहिब येथे ही बैठक होणार आहे.

सुमारे ३०० डेऱ्यांची यादी तयार आहे

शोधमोहिमेसाठी पंजाबमधील ३०० हून अधिक डेऱ्यांची यादी तयारी करण्यात आली आहे. जालंधर, कपूरथला, होशियारपूर व भटिंडा येथील डेरे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. अमृतपाल ज्या कारने होशियारपूर येथून पळून गेला होता, तिचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंग