शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अमृतपालचे आयएसआयशी संबंध? पंजाब पोलिसांचा दावा; एनआयएची एंट्री शक्य, ४ सहकाऱ्यांना हलविले आसामला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 6:57 AM

अमृतपालच्या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि पंतप्रधान बाजेका या सदस्यांना एका विशेष विमानाने दिब्रुगडला आणण्यात आले.

चंडीगड/दिब्रुगड : कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या ४ सदस्यांना पंजाबमधून अटक केल्यानंतर रविवारी आसाममधील दिब्रुगडमध्ये नेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. फरारी अमृतपाल सिंगचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेची एंट्री हाेऊ शकते.

अमृतपालच्या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दलजित सिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि पंतप्रधान बाजेका या सदस्यांना एका विशेष विमानाने दिब्रुगडला आणण्यात आले. ते चौघेही सध्या दिब्रुगड मध्यवर्ती तुरुंगात आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

इंटरनेटबंदीत वाढपंजाब सरकारने सोमवारी दुपारपर्यंत मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवांचे निलंबनदेखील वाढवले आहे. सरकारच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यासह हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. अमृतसर ग्रामीण एसएसपी सतिंदर सिंह यांनी सांगितले की, अमृतपालच्या जवळच्या मित्राकडून १०० हून अधिक अवैध काडतुसे सापडली आहेत. चौकशीत अमृतपालने ही काडतुसे दिल्याचे त्याने सांगितले. राज्यव्यापी कारवाईत पाेलिसांनी माेठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

आनंदपूर खालसा फोर्स नावाने सैन्य उभारणी?डीआयजी स्वपन शर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा केला. त्याला परदेशातून निधी मिळत असावा, असा पोलिसांना संशय आहे.  अशा परिस्थितीत आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एंट्री होऊ शकते. अमृतपालने आनंदपूर खालसा फोर्स (एकेएफ) नावाने स्वतःचे खासगी सैन्य तयार करण्याची तयारी केली होती. त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर एकेएफ लिहिलेले आढळले. 

अमृतपालसिंग ताब्यात, वडील, वकिलांचा दावाअमृतपालच्या अमृतसरमधील जल्लूपूर खेरा या मूळ गावीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. गावात त्याचे वडील तरसेम सिंह यांनी आरोप केला आहे की आपल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालपासून त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. 

ट्रक चालक ते ‘भिंद्रानवाले २.०’दुबईच्या रस्त्यांवर ट्रक चालविणारा अमृतपाल सिंग धर्मोपदेशकापासून कट्टर ‘खलिस्तान’ समर्थक म्हणून पुढे आला. पंजाबला स्वतंत्र करण्याची मागणी करणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकावण्यापर्यंतच्या कारनाम्यांमुळे त्याला ‘भिंद्रनवाले २.०’ असे संबोधण्यात येऊ लागले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब