मराठीही झाली भाषाजननी : साहित्य अकादमीचे शिक्कामोर्तब; सहा दशकांनंतर लढ्याला यश; राजभाषादिनी अधिकृत पत्ररघुनाथ पांडे - नवी दिल्लीदोन हजार वर्षांचे प्राचीनत्व मान्य करीत मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा देण्याची शिफारस साहित्य अकादमीने केंद्र सरकारकडे एकमताने केली आहे़ सहा दशके सुरू असलेल्या लढ्याची यशाने इतिश्री झाली! २७ फेब्रुवारीला म्हणजेच मराठी राजभाषा दिनी केंद्र सरकार राज्याला अधिकृत पत्र देणार असून, तत्पूर्वी आठवडाभरात केंद्राकडून अधिसूचना जारी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले़ मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या शिफारशीचे पत्र साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रताप तिवारी यांच्या सहीने शुक्रवारी केंद्र सरकारला देण्यात आले. या पत्रासोबत अकादमीच्या बुधवारी झालेल्या भाषा समितीच्या बैठकीचे इतिवृत्तही जोडण्यात आल्याची माहिती अकादमीच्या सचिवालयाने ‘लोकमत’ला दिली. तब्बल दीड वर्षे रखडलेली साहित्य अकादमीच्या भाषा समितीची बैठक बुधवारी सात तास चालली. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी चर्चा करून मराठी दिनापूर्वी समितीची बैठक घेण्याचा आग्रह धरला होता.अनेक गुंतागुंतीचे विषय सदस्यांनी उपस्थित केले होते. त्यांनाही मराठी भाषा पुरून उरली. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीचा अहवाल त्यासाठी योग्य ठरला. - भालचंद्र नेमाडे, निमंत्रित सदस्य, भारत सरकारच्कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.च्भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे.च्भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी. च्भाषेचे आधुनिक रूप हे प्राचीन रूपांहून भिन्न असल्यास चालेल; पण त्यात आंतरिक नाते असावे.च्हे चारही निकष मराठीने पूर्ण केले.
अमृताते पैजा जिंकणाऱ्या मराठीला अभिजात दर्जा!
By admin | Published: February 08, 2015 2:55 AM