न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 06:39 PM2023-02-14T18:39:59+5:302023-02-14T18:40:28+5:30

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सर्वात जुन्या दूध संघाच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी भाजपाने कब्जा केला आहे. 

Amul Dairy for the first time under BJP's control; Overturned the power of Congress for so many years | न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

googlenewsNext

गुजरातनंतर अवघा देश जिंकणाऱ्या भाजपाला आजवर अमूल डेअरी जिंकता आली नव्हती. या सहकारी संघावर आजवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. परंतू, आज या संघावर भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार हजार कोटींची उलाढाल असलेल्या या दूध संघावर कमळ खुलले आहे. 

गुजरातमध्ये सातव्यांदा सत्तेत आलेल्या भाजपाला खेडा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ, आणंदवर विजय मिळविता आला नव्हता. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सर्वात जुन्या दूध संघाच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी भाजपाने कब्जा केला आहे. 

भाजपचे विपुल पटेल हे अध्यक्ष तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले कांतीभाई सोढा परमार हे उपाध्यक्ष झाले आहेत. खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, आणंद ला अमूल डेअरी म्हणून ओळखले जाते. विपुल पटेल हे खेडा भाजपाचे अध्यक्ष आहेत. 

खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर बराच काळ काँग्रेसचा कब्जा होता. युनियनमध्ये भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी अमूल डेअरीचे पाच संचालक भाजपात दाखल झाले होते. निवडणुकीपूर्वी अमूल डेअरीच्या अध्यक्षपदी रामसिंग परमार तर उपाध्यक्षपदी राजेंद्रसिंह परमार होते. 

काँग्रेसच्या तिकिटावर आणंदचे आमदार झालेल्या कांतीभाई सोढा परमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत झेलाजी झाला, शारदाबेन परमार, सीताबेन परमार आणि जुवानसिंग चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाचे आठ संचालक झाले. तर काँग्रेसकडे पाच संचालक उरले होते. यामुळे भाजपाला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत विजय मिळविता आला. 

Web Title: Amul Dairy for the first time under BJP's control; Overturned the power of Congress for so many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.