नवी दिल्लीः भारताची सर्वात मोठी डेअरी फार्म आणि दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलचं ट्विटर अकाउंट Boycott Chinese Products मोहिमेवरील जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर ब्लॉक झाल्यानं एकच खळबळ उडाली. अमूलने ट्विटरवर एका कार्टूनचे पोस्टर शेअर केले होते, ज्यात चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं ट्विट अकाऊंटच ब्लॉक करण्यात आलं. अमूलनं ट्विटरवरील पोस्टमध्ये एक्झिट द ड्रॅगन नावाचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं.या व्यंगचित्रात ड्रॅगनशी लढून अमूल गर्ल आपला देश वाचवताना दाखवण्यात आली आहे. चिनी कंपनी असलेल्या टिकटॉकचा लोगोही या व्यंगचित्रात पाहायला मिळतोय. तसेच या व्यंगचित्रात अमूल 'मेड इन इंडिया' ब्रँड असल्याचे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. त्यांचा उद्देश पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देण्याचा आहे. काही काळानंतर ट्विटरनं हे ब्लॉक केलेलं खाते पुन्हा सक्रिय केले आले.
हेही वाचा
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या
सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...
चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन
गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल
Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी
पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार
...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख