उदयपूर : उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला पूल अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटरच्या स्फोटाद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. या स्फोटामुळे रुळांना तडे गेले आहेत. हा घातपाती प्रकार घडण्याच्या चार तास आधी त्या पुलावरून एक रेल्वेगाडी रवाना झाली होती. मीटरगेज असलेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले होते. त्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मे रोजी उद्घाटन केले होते. यामागे दहशतवाद्यांचा हात आहे का हे शोधण्याच्या दिशेनेही तपास करीत आहेत.उदयपूरचे जिल्हाधिकारी ताराचंद मीणा म्हणाले की, डिटोनेटर्सने पूल उडविण्याचा कट समोर आला आहे. उदयपूरचे पोलिस अधीक्षक विकास शर्मा यांनी सांगितले की, पूर्वनियोजित कटानुसार हा स्फोट घडविण्यात आल्याचे दिसून येते. त्यासाठी वापरलेला डिटोनेटर सुपर ९० श्रेणीतील आहे. (वृत्तसंस्था)
...तर अनेकांचा प्राण गेला असताn उदयपूरपासून ३५ किमी अंतरावर सलुंबर येथील केवडे ओढा रेल्वे पुलावर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. n यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. रेल्वे रुळावर त्यांना दारूगोळा तसेच अनेक ठिकाणी रूळ तुटल्याचे दिसले. तसेच पुलावरील नट-बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली. यानंतर ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्या रुळावर ट्रेन आली असती तर अनेकांचा जीव धोक्यात आला असता.
गाड्या थांबविल्यापुलावर स्फोट झाल्याचे लक्षात येताच त्यानंतर अहमदाबादहून उदयपूरला जाणारी रेल्वेगाडी डुंगरपूर येथे थांबविण्यात आली. तशीच दक्षता या मार्गावरून जाणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांबाबत घेण्यात आली.डिटोनेटरचा शक्तिशाली स्फोट होऊन रेल्वे रूळ उद्ध्वस्त झाले असते व पूल उडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर त्याचा गुजरात, इतर राज्यांच्या रेल्वे वाहतुकीवर आणखी विपरित परिणाम झाला असता. ३५ मीटर उंचीचा पूल सलंबुर मार्गावर बांधलेला रेल्वेपूल सुमारे ३५ मीटर उंच, ४ मीटर रुंद असून त्याची लांबी ४५.७ मीटर आहे. २०१७ रोजी हा पूल बांधण्यास सुरुवात झाली होती. उदयपूर-अहमदाबाद मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. याच रेल्वेमार्गावर उदयपूर-अहमदाबाद दरम्यान सुरू केलेल्या नव्या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असारवा रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविला होता.