शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हृदयद्रावक! जेलमध्ये टाका पण पत्नीकडे पाठवू नको; पती वैतागला, ८ महिन्यांच्या मुलीला सोडून पळाला

By ओमकार संकपाळ | Published: August 18, 2024 1:51 PM

पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या व्यक्तीने पळून जाणे पसंत केले.

सोशल मीडियाच्या या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. दिल्लीतील नोएडा येथे एक अशीच एका व्यक्तीला प्रसिद्धी मिळवून देणारी घटना उघडकीस आली. जितकी हास्यास्पद तितकीच संतापजनक असलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या व्यक्तीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना सापडताच त्याने तुरंगात टाका पण पत्नीकडे जायचे नसल्याचे सांगितले. बंगळुरूहून पळून नोएडाला आलेला एक व्यक्ती मॉलमध्ये चित्रपट पाहून बाहेर पडला. तितक्यात पोलिसांनी त्याला पकडले. त्याला राग अनावर झाला तेव्हा तो म्हणाला की, मला तुरुंगात टाका, पण मला माझ्या पत्नीकडे पाठवू नका. हे उत्तर ऐकून पोलीसही अवाक् झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इंजिनिअर व्यक्ती बसने तिरुपतीला गेला, त्यानंतर ट्रेनने भुवनेश्वरला पोहोचला. तिथून दिल्लीला आला, नंतर नोएडाला गेला.

आपला पती बेपत्ता झाल्याची माहिती पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तसेच पतीला शोधण्यात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही तिने केला. पतीचे अपहरण झाल्याचा तिला संशय होता. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्या व्यक्तीने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, मात्र त्यातही काहीच हाती लागले नाही.

"जेलमध्ये टाका पण पत्नीकडे पाठवू नको"अभियंता नोएडातील मॉलमधून बाहेर आला तेव्हा त्याला बंगळुरू पोलिसांच्या तीन तपास अधिकाऱ्यांनी घेरले. सर्वजण साध्या वेशात होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बंगळुरूला परत जाण्यास सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने विरोध केला. मात्र, काही तासांनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला समज देऊन परत नेले. अभियंत्याने पोलिसांना विरोध करताना सांगितले की, हवे असल्यास मला तुरुंगात टाका, परंतु पत्नीकडे पाठवू नका. पण, त्याच्या पत्नीने दाखल केलेली बेपत्ता तक्रार केवळ त्याच्या उपस्थितीतच बंद केली जाऊ शकते असे पोलिसांनी सांगितल्यावर अभियंता परत येण्यास तयार झाला.

पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या अभियंत्याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी त्याला खूप त्रास देते. मी तिचा दुसरा नवरा आहे. तीन वर्षांपूर्वी मी तिला भेटलो तेव्हा तिचा घटस्फोट झाला होता. ती १२ वर्षांच्या मुलीची आई आहे. माझे हे पहिलेच लग्न होते. आम्हाला आठ महिन्यांची एक मुलगीही आहे. ती मला खूप बंधने घालते... मी एकटा चहा देखील प्यायला जाऊ शकत नाही. जेवताना भाताचा कण, भाकरीचा तुकडा पडला तरी खूप ऐकावे लागते. तिच्या इच्छेनुसारच मला कपडे परिधान करावे लागतात. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारSocial Viralसोशल व्हायरल