शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

घरात घुसला चोर, २ दिवस खाल्लं, प्यायलं आणि देवघरात केली आत्महत्या; बंगळुरूमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 4:57 PM

बंगळुरू येथे एका चोरट्याने बंद घरातू घुसून २ दिवस खाल्लं, प्यायलं आणि आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

बंगळुरू : विदेशी दौरा करून परतलेल्या एका जोडप्याला त्यांच्या राहत्या घरी एक धक्कादायक सरप्राईज मिळाले आहे. खरं तर ते त्यांच्या बंगळुरूच्या घरी पोहोचले असता एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही. या जोडप्याने घराच्या मागील बाजूस जाऊन तेथील दरवाजा उघडण्यास सुरुवात केली परंतु येथेही तो प्रयत्न फसला. घराचा दरवाजा उघडता येत नव्हता. तेवढ्यात अचानक या जोडप्याची नजर एका बोल्टवर पडली, ज्यामुळे त्यांना आपल्या घरात काहीतरी गडबड असल्याची शंका आली. या जोडप्याने पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी दरवाजा तोडला. घरात शिरल्यावर आतील स्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. घरातील सर्व सामान विखुरलेले असून एका व्यक्तीचा मृतदेह देवघरात लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता लटकलेली व्यक्ती चोर असल्याचे आढळून आले. तो घरात शिरला. त्याने खाल्ले, प्यायले आणि नंतर घरात गळफास घेतला. मात्र या चोरट्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीधर सुमंत रॉय हे इंदिरानगर येथे राहतात. काही दिवसांसाठी ते त्यांच्या पत्नीसोबत अॅमस्टरडॅमला गेले होते. हे दाम्पत्य तेथून परतले आणि त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उघडला नाही. म्हणून त्यांनी मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे त्यांना दरवाजात छेडछाड झाल्याचे दिसले. दरवाजा आतून बंद होता. घराच्या मुख्य दरवाजालाही आतून कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तोडला दरवाजा या जोडप्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून माहिती दिली. काही वेळातच पोलील घटनास्थळी पोहचले. आजूबाजूचे लोकही जमा झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता देवघराची खोली आतून बंद आढळून आली. पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता आतमध्ये एक व्यक्ती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता एक व्यक्ती मागील दाराने घरात शिरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो घरात चोरी करत असल्याचे दिसत आहे. बेडरूममध्ये पोहोचल्यावर त्याला तिथे व्हिस्कीची बाटली सापडली. त्याने व्हिस्की प्यायली आणि मग स्वयंपाकघरात गेला. किचनमध्ये जाऊन त्याने फ्रीज उघडला. फ्रिजमध्ये ठेवलेले स्नॅक्सचे सेवन केले. किचनमधून परत आल्यानंतर तो बेडरूममध्ये जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी तो बाथरूममध्ये गेला आणि तिथे त्यांने आंघोळ केली. 

बंगळुरूमधील धक्कादायक घटना आंघोळीवरून आल्यानंतर त्याने बेडरूममध्ये ठेवलेली व्हिस्की पुन्हा प्यायली. किचनमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ पुन्हा खाल्ले आणि अख्खा दिवस असाच घालवला. सायंकाळी तो देवघरात गेला आणि काही वेळाने त्याने गळफास लावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार (४६) असे मृताचे नाव आहे, त्याला यापूर्वी २०१६ मध्ये घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आली होती. चोरट्याने गळफास का लावला याची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BengaluruबेंगळूरtheftचोरीPoliceपोलिस