कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका विद्यार्थिनीला तिच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचा धक्का बसला आणि तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इरिगेशन कॉलनी रामपूर येथे राहणाऱ्या रिचा सोंढिया या तरुणीने आपले आत्महत्या केली. रिचाचे तिच्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होते, परंतु काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती डिप्रेशनमध्ये गेली होती. अशा परिस्थितीत तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलले.
दरम्यान, रायपूरमध्ये राहणाऱ्या आणि डीसीएचे शिक्षण घेत असलेल्या रिचा सोंढियाने तिचा मित्र अनिकेत मिश्रासोबत 40,000 रुपयांना महागड्या जातीच्या कुत्र्याची खरेदी केली होती असे सांगितले जात आहे. रिचा तिच्या लाडक्या कुत्र्याचा खूप लाड करत असे. ती नेहमी त्याच्यासोबत असायची. अलीकडेच या कुत्र्याची प्रकृती खालावली आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या डॉगीच्या मृत्यूने रिचा पूर्णपणे तुटली होती. ती सतत रडायची, त्यानंतर नैराश्यात तिने मृत्यूला कवटाळले.
एकुलत्या एक मुलीचा मृत्यूमृत तरूणीची आई महसूल विभागात शिपाई म्हणून काम करते. पती गेल्यानंतर तिचा एकमेव आधार तिची मुलगी होती, पण तिनेही तिच्या आईला एकटे सोडून आत्महत्या केली. फासावर लटकलेल्या अवस्थेत रिचाला पाहताच तिला एनकेएच रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
तरूणीच्या आईचा गंभीर आरोप रिचाची आई तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी तिच्यासह अनिकेत मिश्राला जबाबदार धरत आहे. अनिकेतने रिचाला पैशांसाठी त्रास दिला नसता तर कदाचित तिचा जीव वाचला असता, असे तिचे म्हणणे आहे. आता त्या तरुणावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत रिचाच्या आईने केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"