नवी दिल्ली : पश्चिमविहार परिसरातील आनंदवन सोसायटीत राहणाऱ्या वृद्ध बहिणींच्या हत्येनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तिथे राहणाºया उषा (७५ वर्षे) आणि आशा पाठक (७० वर्षे) या बहिणींचा मृतदेह गुरुवारी घरात आढळल्याने खळबळ उडाली. पाठक भगिनींवर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.ही मराठी लोकांची सोसायटी असल्याने अन्य भाषकांना तिथे राहता येत नाही. तिथे १00 फ्लॅटस् आहेत. आशा आणि उषा पाठक या दोघीही अविवाहित होत्या. उषा निवृत्त संगीत शिक्षिका होत्या, तर आशा ग्रंथपालपदावरून निवृत्त झाल्या होत्या. गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांच्याकडे काम करणारी महिला आली, तेव्हा घराचा दरवाजा किलकिला होता. आतील सामान अस्ताव्यस्त पसरले होते. तिने आसपासच्या लोकांना याची माहिती दिली.लोकांनी तातडीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींची गळा दाबून हत्या झाली आहे. त्यांच्या गळ्यावर जखमाही दिसत होत्या. दोघींनी मारेकºयांना प्रतिकार केला असावा, असा अंदाज आहे.>दोन महिन्यांतील तिसरी घटनापश्चिमविहार परिसरात ज्येष्ठांची हत्या होण्याची दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. सप्टेंबरमध्ये या भागातील शशी तलवार या साठ वर्षे वयाच्या वृद्धेची व त्यांच्या दिव्यांग मुलीची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या घरातून कोणतेही सामान चोरीला गेले नव्हते. त्यामुळे दोन महिलांची अशा निर्घृण पद्धतीने हत्या का केली असावी, या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. नंतर १० आॅक्टोबरला पश्चिमविहार भागातील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून चोरी करण्यात आली होती.
दिल्लीत वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:57 AM