नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पहिल्या लाटेतील संक्रमणावर मात करण्याऱ्या देशांमध्ये जपान (Japan) सुद्धा आहे. मात्र, आता येथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहेत. येथील ओसाकामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 'भारतावर टीका' करणार्या लोकांना शांत राहण्याचा आणि जपानने 'मुंबई मॉडेल'चे (Mumbai Model) अनुसरण करण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. मात्र, अनेक नेटिझन्सनी या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. (anand mahindra advised japan to adopt mumbai model users protest)
सोशल मीडीयावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी जपानी मीडियाची एक बातमी शेअर केली होती. तसेच, यासोबत लिहिले होते की,"कोविड विरोधात लढाई आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत जपानी मॉडेल पाहिजे होते. पण हो, आता कोणीही सुरक्षित नाही. भारतावरील टीका थांबली पाहिजे आणि आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, आपल्याला जग एकत्र मिळून सुधारले पाहिजे. ओसाकाने मुंबई मॉडेलचा विचार केला पाहिजे."
बर्याच लोकांनी आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटचे कौतुक केले आहे. युजर्स असे म्हणत आहेत की, 'काही झाले तरी कोणीतरी भारताच्या टीकेच्या विरोधात बोलत आहे. ही काळाची गरज आहे'. तर दुसरीकडे, काही युजर्संनी आनंद महिंद्रा यांचे ट्विटचा चुकीचा अर्थ काढला आहे. सरकार आणि देश समान असल्याचे आनंद महिंद्रा यांनी आहेत. मात्र, ते सरकारवर टीका करीत आहेत, असे काही युजर्संनी म्हटले आहे.
(Corona Vaccination : ... म्हणून न्यूड क्लबमध्ये उघडले लसीकरण केंद्र!)
मुंबई मॉडेलचे कौतुककोरोनाची पाहिली लाट पाहता मुंबईतील जबाबदार व्यक्तींनी दुसर्या लाटेच्या अगोदर बरीच तयारी केली होती. मुंबईत बेड, ऑक्सिजन पुरवठा, साठवण सुविधेची व्यवस्था आणखी सुधारली. अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालये तसेच काही खासगी रुग्णालये सुद्धा सुधारित केली होती. यावेळी कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी वॉर रूम तयार करण्यासारखे उपाय करण्यात आले होते.