Anand Mahindra Nitin Gadkari : दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते काही ना काही आपल्या सोशल मीडियावरून शेअरही करत असतात. आनंद महिंद्रांनी नुकतंच केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. "इस्तांबूल टेक्निकल युनिव्हर्सिटी (Istanbul Technical University) द्वारे रस्त्यांवर विंड टर्बाइन लावण्यात आले आहेत. गाड्यांच्या वेगामुळे निर्माण होण्याच्या हवेच्या मदतीनं हे टर्बाइन फिरतात. भारतातील गाड्यांची ये जा पाहता आपणही पवन ऊर्जेत जागतिक ताकद बनू शकतो. गडकरीजी.. आपण हे आपल्या रस्त्यांवर आणि महामार्गांवर लावू शकतो का?," असा सवाल त्यांनी केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी एरिक सोलहीम यांच्या ट्वीटला रिट्वीट करत गडकरी यांना हा प्रश्न विचारला आहे. एरिक सोलहीम ग्रीन बेल्ट अँड रोड इन्स्टीट्यूटचे प्रेसिडेंट आहेत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं टर्बाइनच्या शेजारून जितक्या गाड्या वेगानं जातात, त्याच्या माध्यमातून तयार होणाऱ्या हवेमुळे ते तेजीनं फिरतात. यामुळे वीज निर्मिती होते. इस्तांबुलमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तसंच याचं कौतुकही होत आहे.