महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विशेष म्हणजे आपल्या ट्विटमध्ये ते युजर्संनाही सहभागी करुन घेत असतात. अनकेदा जुगाडू लोकांचे व्हिडिओ ते शेअर करत त्यांना बंपर ऑफरही देताना दिसून येतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:साठी एक नवी कार खरेदी केली. त्यानंतर, ट्विटरवरुन नवीन स्कॉर्पिओ एन कारची चावी घेताना एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहनही केले होती. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर, महिंद्रा यांनी आता एक ट्रॅक्टरचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर करत नेटीझन्सना एक ऑफर दिली आहे. हा ट्रॅक्टर महिंद्राचा आहे हे नक्कीय. पण, कोणत्या देशात हा ट्रॅक्टर आहे? बरोबर उत्तर देणाऱ्या पहिल्या युजर्सला फोटोत दिसत असलेला या ट्रॅक्टरचा स्केल मॉडेल पाठवेन, असेही त्यांनी म्हटलं आहे. महिंद्रा यांनी ट्विट केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटीझन्सनेही कमेंटही केल्या आहेत. त्यामध्ये, ब्राझील, रशिया, जर्मनी, बेल्जीयम या देशांची नावे दिली आहे. त्यामुळे, आता उत्तरादाखल महिंद्रा हे काय ट्विट करतात हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Anand Mahindra Twitter Video) अनेक ट्रॅक्टर एका रांगेत उभे असल्याचं दिसतंय. पहिला ट्रॅक्टर ट्रॉली शिलाई मशीन आणि इतर गोष्टींनी सजवण्यात आलंय. कोणा एका कार्यक्रमासाठी ही सजावट केल्याचं समोर आलंय. तसेच ट्रॅक्टरवर एक महिला हसताना दिसतेय. त्याच्या ट्रॉलीवर लाकडी नावाची सजावट करण्यात आली आहे. एक स्त्री आणि एक पुरुष काचेच्या केबिन असलेल्या ट्रॅक्टरजवळ एका रांगेत उभे असल्याचं दिसतात. या ट्रॅक्टरची ट्रॉलीही सजलेली दिसत आहे. तुम्हाला आनंद महिंद्रांच्या प्रश्नाचं उत्तर समजल्यास तुम्हीही टॅक्टर मिळवू शकता.
स्कॉर्पिओसाठी लाल भीम
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांच्या नवीन स्कॉर्पिओ-एनसाठी अंतिम नाव जाहीर केले. आपल्या स्कॉर्पिओसाठी नवीन नाव मिळाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणतीही स्पर्धा शिल्लक राहिली नव्हती. भीमच विजेता आहे, माझा लाल भीम, नावं सूचवल्याबद्दल धन्यवाद असे ट्वीट त्यांनी केले आहे.