सोशल मीडियावर अनेकदा मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र ते खरेच असतात असं नाही. इंटरनेटवर अनेकदा बोगस व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होतात. अनेक जण यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र सत्य समजताच अनेकांना धक्का बसतो. उद्योगपती आनंद महिंद्रांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला.
आनंद महिंद्रा यांच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाली. विशेष म्हणजे व्हायरल पोस्ट आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचली. आनंद महिंद्रा यांनी कधीच न काढलेले उद्गार त्यांच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अखेर यावर आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून यावर भाष्य केलं. आपण कधीच असं बोललो नसल्याचं महिंद्रा यांनी स्पष्ट केलं.
आपलं नाव वापरून कोणत्याही विधानांच्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महिंद्रा यांनी दिला. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये अर्शद वारसीचं मीम शेअर केलं आहे. त्यावर जॉनी एलएलबी सिनेमातील अर्शदचा 'कौन है ये लोग कहा से आते है ये लोग' हा प्रसिद्ध डायलॉग आहे.
आनंद महिंद्रा यांच्या नावानं खोटी माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार आठवड्याभरात दुसऱ्यांदा घडला आहे. वर्षभर केलेल्या गुंतवणुकीनं आनंद महिंद्रा यांना श्रीमंत केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं होतं. त्यात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा उल्लेख होता. ती बातमीदेखील बोगस होती. आपण क्रिप्टोमधील काहीच गुंतवणूक केली नसल्याचं यानंतर महिंद्रा यांनी सांगितलं.