Anand Mahindra Viral Post: भारतात तुम्हाला अनेक ठिकाणी 'देसी जुगाड' पाहायला मिळेल. अनेकदा लोक जुन्या झालेल्या वस्तुमधून नवीन एखादी गोष्ट बनवतात. अशाच प्रकारचा एक देसी जुगाडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने जुन्या स्कूटरचा असा देसी जुगाड बनवला, ज्यामुळे कंस्ट्रक्शन साइटवर त्या स्कूटरला उपयोगात आणता येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्कूटरच्या मदतीने सीमेंटने भरलेल्या पोत्यांना चौथ्या मजल्यावर पोहोचवले जात आहे. या स्कूटरच्या पाठीमागच्या चाकाला एक दोरी बांधली, ज्याद्वारे 2-3 मंजल्यापर्यंत सामान नेता येत आहे. हा व्हिडिओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही चकीक झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "यामुळेच आपण याला 'पॉवरट्रेन' म्हणतो. गाडीच्या इंजिनला उपयोगात आणण्याचे अनेक पर्याय आहेत." आनंद महिंद्रांच्या ट्विटमध्ये काही लोकांनी या स्कूटरची किंमत सांगितली. एका यूजरने लिहिले की, अशा प्रकारचे जुने स्कूटर बाजारात 2-4 हजारात विकले जातात. दुसऱ्या एकाने लिहिले, गरज शोधाची जननी आहे.