अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अघोषितरीत्या ७५ वर्षांची वयोमर्यादा आखली असल्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पटेल येत्या नोव्हेंबरमध्ये वयाची पंचाहत्तरी गाठणार आहेत. या अघोषित नियमामुळे अनेक वयोवृद्ध नेत्यांना सरकारमध्ये स्थान मिळाले नव्हते, तसेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला यांना राजीनामा द्यावा लागला होता. आनंदीबेन पटेल २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. त्यांचा जन्म १९४१चा असून, येत्या २१ नोव्हेंबर रोजी त्या ७५ वर्षांच्या होतील. पटेल जेव्हा पंचाहत्तर वर्षांच्या होतील, तेव्हा काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, असे भाजपाच्या एका नेत्याने म्हटले. त्यांना पद सोडण्यास सांगितले जाईल अथवा त्यांचा अपवाद ठरून २०१७च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी एक वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यात येईल, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत, असे दुसऱ्या एका नेत्याने सांगितले. मोदींनी आखून दिलेली वयोमर्यादा लक्षात घेऊनच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वरिष्ठ नेते बाबुलाल गौर व सरताजसिंह यांच्यासह इतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला होता. >अनेकांना मिळाले नव्हते मंत्रिपद२०१४मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा वय झाल्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा यांसारख्या अनेक वरिष्ठ पक्षनेत्यांना मंत्रिपद दिले गेले नव्हते. तेव्हा सिन्हा यांनी भाजपाने ७५ वर्षांहून अधिक वयाच्या नेत्यांना २६ मे २०१४ रोजी ब्रेन डेड (मेंदू मृत ) घोषित केल्याचे म्हटले होते.
आनंदीबेन यांचे मुख्यमंत्रिपद जाणार?
By admin | Published: July 19, 2016 5:57 AM