शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आनंदीबेन पटेल यांच्या कन्येला स्वस्तात जमीन

By admin | Published: February 06, 2016 2:57 AM

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार जयेश पटेल (४५) यांच्या एका ‘बिझनेस पार्टनर’च्या वाईल्डवूड रिसॉर्ट अ‍ॅण्ड रियाल्टीस या कंपनीला राज्यातील गीर अभयारण्याला लागून असलेली

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीगुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची कन्या अनार जयेश पटेल (४५) यांच्या एका ‘बिझनेस पार्टनर’च्या वाईल्डवूड रिसॉर्ट अ‍ॅण्ड रियाल्टीस या कंपनीला राज्यातील गीर अभयारण्याला लागून असलेली २५० एकर सरकारी जमीन अवघ्या १५ रुपये प्रति वर्गमीटर दराने विकण्यात आली आहे. कोट्यवधींची सरकारी जमीन अशी कवडीमोल भावात आपली कन्या आणि तिच्या व्यावसायिक भागीदारांना विकल्याबद्दल आनंदीबेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.या संपूर्ण जमीन सौद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात आली पाहिजे. कारण दुसऱ्या चौकशी संस्थेकडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले. ज्यावेळी ही कृषी जमीन अनार पटेल यांना देण्यात आली त्यावेळी नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच ‘लँड यूज’ बदलण्यात आले. त्यामुळे कृषी जमिनीचा उपयोग अन्य व्यावसायिक उद्देशासाठी करण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप शर्मा यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.अनार पटेल यांना जमीन देण्यात आल्याची आणि जमिनीचा लँड यूज बदलल्याची माहिती मोदींना होती काय? ज्यांना ही जमीन दिली जात आहे, त्यांचे आनंदीबेन पटेल आणि त्यांची कन्या अनार पटेल यांच्यासोबत व्यावसायिक संबंध आहेत याची मोदींना कल्पना होती काय, असा सवाल करून आज पंतप्रधान असलेले मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शर्मा यांनी केली.शर्मा पुढे म्हणाले, ‘ही जमीन वाटप करण्यात आली त्यावेळी आनंदीबेन गुजरातच्या महसूलमंत्री होत्या. आज हे खाते त्यांच्याचकडे आहे. जो पंतप्रधान भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही असे सांगतो, न खाऊंगा, न खाने दुंगा असे म्हणतो त्याच्याच अध्यक्षतेखालील बैठकीत कोट्यवधी रुपयांची जमीन अशी कवडीमोल दराने विकली जाते. तिचा भूउपयोग बदलला जातो. हे सर्व आनंदीबेन यांच्या कन्येच्या फायद्यासाठी केले असेल तर मोदींनी उत्तर दिलेच पाहिजे. कारण ते त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. आनंदीबेन पटेल यांनी आपली कन्या व तिच्या व्यावसायिक भागीदारांना लाभ पोहोचविण्यासाठी कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात विकली.’वाईल्डवूड कंपनीला ४२७ एकर सरकारी जमीन देण्यात आली. त्यापैकी २५० एकर जमीन केवळ १५ रुपये वर्गमीटर भावाने देण्यात आली. हा सौदा २०१० मध्ये झाला होता. त्यावेळी गीर अभयारण्याला लागून असलेल्या या २५० एकर जमिनीची बाजारभाव किंमत १२५ कोटी रुपये होती. पण ही जमीन वाईल्डवूडला केवळ दीड कोटी रुपयांत देण्यात आली. वाईल्डवूडच्या प्रवर्तकांना रिसॉर्ट बांधण्याचा कसलाही अनुभव नव्हता. पण केवळ अनार पटेलशी व्यावसायिक संबंध असल्यामुळे ही जमीन देण्यात आली.या जमिनीचे सर्व व्यवहार कागदोपत्री असल्याचे अनार पटेल, शाह आणि सेठ यांनी स्पष्ट केले आहे. जी २५० एकर जमीन वाईल्डवूडला देण्यात आली ती जमीन अमरेली जिल्ह्यातील गीर येथे असलेल्या प्रसिद्ध गीर अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे तिचे व्यावसायिक मूल्यही फार मोठे आहे. शिवाय वाईल्डवूडला आणखी १७२ एकर कृषी जमीन विकत घेण्याची आणि ही जमीन अकृषक जमिनीत रूपांतरित करण्याची परवानगी देण्यात आली होती.या २५० एकर जागेवर पर्यटक रिसॉर्ट बांधण्याची योजना होती, पण ती फलद्रूप झाली नाही, असे वाईल्डवूडच्या मूळ प्रवर्तकांनी सांगितले. पर्यटक रिसॉर्ट बांधण्याला मनाई हुकूम नाही आणि त्यासाठी सर्व प्रकारची मंजुरीही मिळविण्यात आली आहे. पण अद्याप रिसॉर्ट मात्र बांधण्यात आलेले नाही, असे कंपनीच्या विद्यमान प्रवर्तकांचे म्हणणे आहे.या कंपनीत संजय धनक व दक्षेस शाह हे दोन भागीदार होते. त्यांच्या कंपनीने जवळपासची आणखी १७२ एकर जमीनही आपल्या नावे केली. नंतर ही जमीन शाह व अमोल श्रीपाल यांच्या नावावर करण्यात आली. कारण धनक यांनी आपली भागीदारी श्रीपाल यांना दिली होती. या जमिनीची मालकी अनेकदा बदलण्यात आली. त्यानंतर दक्षेस शाह व अनार पटेल यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या ४२७ एकर जमिनीवर कब्जा केला. शाह आणि अनार पटेल हे दोघे अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत.