लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंजाबमधील आनंदपूर साहिबचे आम आदमी पक्षाचे खासदार मलविंदर सिंग कंग यांनी खेळाशी संबंधित काही मुद्दे उपस्थित केले. क्रीडाविश्वात कोण-कोणत्या नव्या उपाय योजना करायला हव्यात? यासंदर्भात त्यांनी काही सूचना केल्या. मात्र, मालविंदर सिंग हे आपल्या संपूर्ण भाषणात 2036 ऐवजी 1936 असा उल्लेख करत होते. एवढेच नाही तर, 1936 मध्ये भारत ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवेल आणि अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असतील, असा दावाही त्यांनी भरसभागृहात केला.
आम आदमी पक्षाचे खासदार मलविंदर सिंग कंग म्हणाले, "आपल्या देशात प्रतिभेची कमी नाही. मात्र, आपल्याला खेळांसाठी लहानपणापासूनच मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करावे लागेल. आम्ही 1936 (2036) मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याच बरोबर, खेळाडूंना तयार करण्यावरही भर द्यावा लागणार आहे. मुलांना नर्सरीपासूनच ऑलिम्पिक खेळांसाठी तयार करायला हवे. मात्र आपल्याकडे, विद्यापीठ अथवा राष्ट्रीय स्तरानंतर खेळाडूला ऑलिम्पिकसाठी तयार केले जाते. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. पण ते मुलांच्या लहान वयातच ओळखावे गेलेल.
मलविंदर सिंग म्हणाले, देशाच्या विविध भागांची क्लस्टरमध्ये विभागणी करून आपल्याला खेळाडूंची निवड करावी लागेल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन त्यांचे कौशल्य वाढवावे लागेल. तरच आपण ऑलिम्पिक स्पर्धेत टॉप 3 मध्ये स्थान मिळवू शकू.
शेवटी मलविंदर सिंग कंग म्हणाले, त्यांना आशा आहे की, 1936 मध्ये भारत ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवेल आणि अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असतील