अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाची सर्वत्र चर्चा होती. यापूर्वी त्यांच्या प्रीवेडिंग सोहळा गुजरातमध्ये वनतारा प्रकल्पात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर युरोपमध्ये कुझवर दुसरा समारंभ झाला. आता मुख्य लग्न घटिकेसाठी जगभरातील नेते, अभिनेते, क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तालवादक शिवमणी याने बॉलिवुडमधील गाजलेल्या गाण्यांवर इम्स वाजविले, त्यावर वराती मोठ्या उत्साहात नाचले. पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. दूसरा प्री-वेडिंग सोहळा जून महिन्यात युरोपमध्ये पार पडला होता. या लग्नावर सुमारे ३ हजार कोटींचा खर्च झालेला आहे.
कोट्यवधींचे घड्याळ पाहुण्यांना भेट
अंबानी कुटुंबाकडून पाठवल्या गेलेल्या लग्नपत्रिकेची किमत तब्बल सात लाख आहे. या लग्नपत्रिकेमध्ये सोन्यासह चांदीच्या देवी- देवतांच्या मूर्तीचा समावेश आहे. लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून फोटींची घड्याळ मिळणार आहेत, बाकीच्या पाहण्यांना काश्मीर, बनारस आणि राजकोटवरून मागवलेल्या खास भेटवस्तू दिल्या आहेत.
नायजेरियन रॅपर रेमाने घेतले सहा कोटी मानधन
नायजेरियन रॅपर आणि गायक-गीतकार रेमाचे मुंबई विमानतळावरील फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. तो खास या लग्नासाठी मुंबईत आला. बेबी काम डाऊन या सुपरहिट गाण्याचा गायक रेमा याने या लग्नात परफॉर्म केले. रेमा लग्नातील परफॉर्मन्ससाठी सहा कोटींहून अधिक रक्कम आकारत आहे.
कर्दाशियन बहिणींनी केला रिक्षाने प्रवास
हॉलिवूड स्टार किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन पहिल्यांदाच भारतात आल्या, तिचा हा पहिला भारत दौरा संस्मरणीयठरण्यासाठी अंबानी कुटुंबीयांनी खास तयारी केली होती. नंतर या दोन बहिणींनी चक्क रिक्षातून प्रवास केला.
कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू
मुकेश व नीता अंबानींनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नानिमित्ताने रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू दिली आहे. त्यात चांदीचं नाणं, मिठाई, शेव, चिवड्याचं पाकिट पाहायला मिळते. त्यामुळे कर्मचारीही आनंदी झाले.