शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

'वारंवार विनंती...! ...म्हणून अनंत-राधिकाच्या लग्न समारंभात सहभागी होणार ममता बॅनर्जी; या बड्या नेत्यांनाही भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:50 PM

Anant-Radhika Wedding : ग्नल समारंभांत जाणे ममता बॅनर्जी याना फारसे आवडत नाही. मात्र त्या ​अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी जात आहेत. यामुळे अणेकांना आश्चर्य वाटत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नासाठी देशातील अणेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. देशातील काही बडे राजकीय नेतेही या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीही या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईत येत आहेत.

ग्नल समारंभांत जाणे ममता बॅनर्जी याना फारसे आवडत नाही. मात्र त्या ​अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नासाठी जात आहेत. यामुळे अणेकांना आश्चर्य वाटत आहे. यासंदर्भात बोलताना स्वतः ममता म्हणाल्या, 'नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी वारंवार विनंती केल्याने आपण या लग्नासाठी जात आहोत.'

'वारंवार विनंती केली' -कोलकात्याच्या नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल विमानतळावरून मुंबईकडे निघताना माध्यमांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "खरे तर लग्नात सहभागी होण्याचा आपला कसलाही प्लॅन नव्हता. मात्र, अंबानी फॅमिलीने वारंवार विनती करेल्याने आपण या लग्न समारभासाठी जात आहोत. मुकेशजी आणि नीताजी यांनी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी वारंवार विनती केली. म्हणून मी मुंबईला जात आहे."

शरद पवार-उद्धव ठाकरेंनाही भेटणार -मुंबईत पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. यासंदर्भात खुद्द ममता बॅनर्जी यांनीच खुलासा केला आहे. 'आपण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत,' असे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी 13 जुलैला बंगालमध्ये परतू शकतात.

हे राजकीय नेतेही हो शकतात सहभागी -अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न समारंभासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपति रामनाथ कोविंद, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, आंद्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMamata Banerjeeममता बॅनर्जीmarriageलग्नMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानी