जामनगर : उद्योगपती मुकेश अंबानी-नीता अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे जल्लोषात सुरू आहे. पहिला दिवस पॉप गायिका रिहानाचा कलाविष्कार व अनंत अंबानी यांच्या हृदयस्पर्शी मनोगताने गाजविला. त्यांच्या भावना ऐकताना मुकेश अंबानी यांना अश्रू राेखता आले नाही.
अनंत यांनी मंचावरून हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'हे सर्व माझ्या आईने केले आहे. माझ्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी ती गेल्या चार महिन्यांपासून १८-१९ तास काम करत आहे. माझ्यासाठी आणि राधिकासाठी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझे आई-वडील, भाऊ-बहीण आणि वहिनी यांचा खूप आभारी आहे, असे अनंत म्हणाले.
आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल बाेलताना अनंत यांनी सांगितले की, माझे आयुष्य इतके सोपे नव्हते, हेही तुम्हाला माहीत आहे. मला लहानपणापासून अनेक आजार झाले. मात्र, माझ्या वडिलांनी आणि आईने मला हे कधीच जाणवू दिले नाही की मी आजारी आहे. त्यांनी मला सतत धीर दिला. मुलाचे भावस्पर्शी बोलणे ऐकून मुकेश अंबानींच्या डोळ्यात आसवे दाटून आली.
मुकेश अंबानी म्हणाले, अनंतमध्ये वडील धीरूभाईंची झलककॉकटेल नाइटमध्ये मुकेश अंबानी यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'जेव्हा मी अनंतकडे पाहतो तेव्हा, मला माझे वडील धीरूभाई अंबानी यांची झलक दिसते. मला अनंतात अनंत शक्ती दिसते.