राहुल गांधी मतीमंद ; अनंतकुमार हेगडेंच पुन्हा वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:22 PM2019-05-17T16:22:32+5:302019-05-17T17:23:09+5:30
हेगडे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मतीमंद म्हंटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी असे म्हंटले आहे.
मुंबई- गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत असतानाच, त्यांचा पुन्हा वादग्रस्त विधान समोर आल आहे. हेगडे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना मतीमंद म्हंटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी असे म्हंटले आहे.
राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्विटखाली त्यांनी (मोदी लाय) या शब्दाचे काही अर्थही सांगितला होता. राहुल यांच्या त्या ट्वीटला उत्तर देताना हेगडे म्हणाले की, मतीमंद राहुल गांधी हे स्वतःला आंतरराष्ट्रीय मूर्खपणाचे कौशल्य असल्याचे सिध्द करण्यासाठी हद्द पार करत आहे. असे वादग्रस्त विधान हेगडे यांनी केले.
This moron @RahulGandhi is hell bent on proving himself that he is one of his own kind of international idiotic skill master and hence the horizons have extended beyond the boundaries. No one can prevent his growth....Amazing...!!!! https://t.co/0W7GXMHASV
— Chowkidar Anantkumar Hegde (@AnantkumarH) May 17, 2019
याआधी सुद्धा राहुल गांधींना तेलंगणाचे मुख्यमंत्री टीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी मतीमंद म्हंटले होते. साध्वीचं समर्थन करण्यासाठी गोडसेबद्दलच्याव क्तव्यवरून आधीच चर्चेत आलेले हेगडे यांनी आता पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने, भाजप आणि त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्याता आहे.