श्रीनगर : निवडणूक आयोगाने अनंतनाग लोक सभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यासाठी सध्याचे वातावरण भयक ारी आहे, असेसांगून २५ मेरोजीची निवडणूक रद्द के ली. या आधी ही निवडणूक १२ एप्रिल रोजी होणार होती. मुख्यमंत्री मेहबुबा मुμती यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक घेतली जाणार होती. आयोगाच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री फ ारु क अब्दुल्ला यांनी
टीक ा केली आहे. ते म्हणाले, ‘‘क ाश्मीरमध्ये २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुक ा झाल्यानंतर आता २०१७ मध्येत्या रद्द क रण्यापर्यंत आम्ही मागे सरलो आहोत हे बघणे निराशाजनक आहे.’’ ही निवडणूक १२ एप्रिल रोजी होणार होती; परंतु ९ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर श्रीनगर लोक सभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक ीत हिंसाचार होऊ न ८ जण ठार झाले. त्यामुळेती २५ मे रोजी घेण्याचेठरले. श्रीनगर लोक सभा मतदारसंघात त्यावेळी फ क्त ७ टक्के मतदान होऊ न फ ारु क अब्दुल्ला निवडून आले
होते. अनंतनाग मतदारसंघाच्या पोटनिवडणुक ीसाठी राज्याच्या निवडणूक आयोगाने केंद्र सरक ारक डे ६८,७०० सुरक्षा क र्मचारी (६८७ कंपन्या) मागितले होते; परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने ती मागणी फेटाळली.
फ क्त २५० कंपन्याच (२५ हजार क र्मचारी) मिळतील, असेआयोगाला क ळवण्यात आले होते. खोऱ्यात आधीच ५४ कंपन्या (५४ हजार क र्मचारी) तैनात आहेत.