जनकपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 व 12 मे असे दोन दिवस नेपाळ दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या या नेपाळ दौऱ्याची सुरूवात नरेंद्र मोदी ऐतिहासिक शहर जनकपूरपासून करणार आहेत. जनकपूरमध्ये भेट दिल्यानंतर मोदी काठमांडूला रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूरमधील जानकी मंदिरात जाऊन पूजा करणार असल्याची चर्चा आहे. मोदींच्या या भेटीसाठी जनकपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. रामायणातील माहितीनुसार, जनकपूर मिथिला शासकचं केंद्र होतं. वेळेनुसार जनकपूरमध्ये बराच बदल झाला. पर्यटकांसाठी जनकपूर हे शहर आकर्षणाचा विषय आहे. जनकपूरच्या आजूबाजूला असलेल्या विविध ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते.
जनकपूरीमध्ये झाला रामा-सीता विवाहपौराणिक कथेनुसार जनकपुरीमध्ये राम-सीताचा विवाह झाला होता. राम-सीतेचा जेथे विवाह झाला त्या जागी काही काळानंतर जानकी मंदिर बनवलं गेलं. जनकपूर भारत आणि नेपाळशिवाय दुनियेच्या विविध देशात असलेल्या हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचं तिर्थक्षेत्र आहे.
ही ठिकाणं आहेत प्रसिद्ध
पशुपतिनाथयुनिस्कोरच्या जागतिक वारसा सूचीमध्ये या मंदिराचं नाव आहे. बागपती नदीच्याकिनारी हे स्थळ वसलेलं आहे. भगवान शंकराचं असलेलं हे मंदिर हिंदू धर्मियांच्या मुख्य 8 मंदिरांपैकी एक मानलं जातं. धार्मिक स्थळाबरोबर पर्यटन स्थळ म्हणूनही हे स्थळ प्रसिद्ध आहे.
लुंबिनीलुंबिनी हे गौतम बुद्धांचं जन्म स्थळ आहे. भारत-नेपाळ सीमेच्या रुमिनोदेई गावाला लुंबिनी म्हटलं जातं. सम्राट अशोक यांच्या स्मारक स्तंभासाठीही ही जागा ओळखली जाते. तेथे गौतम बुद्ध यांची आई माया देवी यांच्या नावे मायादेवी मंदिर आहे.
देवघाट धामकाली, गंडकी आणि त्रिशुली या तीन नद्यांच्या संगम स्थळावर हे धाम आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक जण येथे येऊन नद्यांमध्ये स्नान करतात.
मुक्तिनाथहे स्थान हिंदू धर्माच्या वैष्णव संप्रदायाचं प्रमुख स्थान मानलं जातं. येथे मुक्तिनाथ शालिग्राम भगवानची पूजा केली जाते. या ठिकाणी जाऊन मुक्ती मिळविली जाते, असा लोकांचा समज आहे.
चांगुनारायण मंदिरया मंदिराला नेपाळचं सर्वात जुनं व प्राचीन मंदिर मानलं जातं. हे मंदिर चौथ्या शताब्दीमध्ये निर्माण केलं गेलं होते. शिवपुरीच्या डोंगरात हे मंदिर असून तेथे भगवान विष्णुबरोबरच शेषनाग ही प्रतिमाही पाहायला मिळते.