शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

बिहारमधील प्राचीन मंदिरे होणार पर्यटनाचा कॉरिडॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 6:45 AM

राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन प्रकल्पांवर भर देताना ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थान म्हणून जाहीर केलेले बिहारमधील प्रसिद्ध बौद्धविहार महाबोधी मंदिर तसेच प्राचीन हिंदू देवस्थानांपैकी एक असलेले विष्णुपद मंदिर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र व पर्यटन कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच राजगीर मंदिर आणि नालंदाच्या विकासाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात पर्यटनासाठी एकूण २,४७९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

 राजगीर मंदिर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, या मंदिराच्या विकासासाठी खास निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. जैन मंदिर संकुलातील हे २०वे तीर्थंकर मुनिसुव्रत मंदिर प्राचीन आहे. येथे सप्तऋषी किंवा सात गरम पाण्याचे झरे एक उबदार पाण्याचे ब्रह्म कुंड तयार करतात. जे पवित्र मानले जाते. भाविकांची याप्रती मोठी श्रद्धा आहे. ‘राजगीर’साठी एक व्यापक विकास उपक्रम राबविला जाईल, असे सीतारामन यांनी जाहीर केले.

नालंदा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करताना नालंदा विद्यापीठाला गौरवशाली उंचीवर नेऊन पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकार पाठिंबा देणार आहे. 

ओडिशा राज्यातील निसर्गसौंदर्य, मंदिरे, स्मारके, कारागिरी, वन्यजीव अभयारण्ये,  प्राचीन समुद्रकिनारे आदींच्या विकासासाठी भरीव आर्थिक साहाय्य देणार.

काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे मॉडेल यशस्वी झाले आहे, त्याच धर्तीवर बिहारमधील मंदिरांचा सर्वसमावेशक विकास केला जाईल.यामुळे रोजगारही निर्माण होतील आणि गुंतवणुकीलाही चालना मिळेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BiharबिहारBudgetअर्थसंकल्प 2024