पाटणा - बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. येथील एका बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क एक मृतदेहच पोहोचल्याने खळबळ उडाली.ही घटना, बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधील शहाजहांपूर ठाण्याच्या परिसरात घडली आहे. येथील सिगरियावा गावाजवळ कॅनरा बँकेची शाखा आहे. या बँकेमध्ये एक मृतदेह घेऊन गावकरी पोहोचल्याने आणि मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढून देण्यासाठी मागणी करू लागल्याने गोंधळ उडाला.सिगरियावा गावातील महेश यादव या ५५ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. महेश यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र अंत्यसंस्कारासाठी आवश्यक पैसे कुणाकडे नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी बँकेत जाऊन महेश यांच्या खात्यातील पैसे काढून देण्याची मागणी केली. मात्र बँक अधिकाऱ्यांनी असे करण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. कॅनरा बँक अधिकाऱ्यांसमोर या प्रकारावरून नियम आणि कायद्यांच्या पेच निर्माण झाला होता.मात्र बँक अधिकारी महेश यांच्या खात्यातील पैसे देण्यास नकार दिल्याने गावकरी महेश यांचा मृतदेह घेऊन बँकेत दाखल झाले. त्यानंतर बँकेत गोंधळ उडाला. अखेरीस गावकऱ्यांचे समाधान करण्यासाठी बँकेच्या व्यवस्थापकांनी आपल्याकडून १० हजार रुपये दिले आणि गावकऱ्यांना मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना केले.मृत महेश यादव हे अविवाहित होते. त्यांनी बँकेत खाते उघडल्यानंतर कुणालाही वारस नोंदवले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वेळा सूचना देऊनही महेश यांनी आपले केवायसी अपडेट केले नव्हते. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी खात्यातील पेसे देण्यास नकार दिला.
...आणि खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी चक्क मृतदेहच पोहोचला बँकेत
By बाळकृष्ण परब | Published: January 07, 2021 3:12 PM
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत वाचल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. येथील एका बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी चक्क एक मृतदेहच पोहोचल्याने खळबळ उडाली.
ठळक मुद्देही घटना, बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधील शहाजहांपूर ठाण्याच्या परिसरात घडलीसिगरियावा गावाजवळ कॅनरा बँकेची शाखा आहेया बँकेमध्ये एक मृतदेह घेऊन गावकरी पोहोचल्याने आणि मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढून देण्यासाठी मागणी करू लागल्याने गोंधळ उडाला