भोपाळ : मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने पक्षाच्या एका कट्टर कार्यकर्त्याचा संकल्पही पूर्ण झाला आहे. राजगडयेथील दुर्गा लाल किरार यांनी 15 वर्षांपूर्वी भाजपचे सरकार आल्याने जोपर्यंत पुन्हा काँग्रेसची सत्ता येत नाही, तो पर्यंत चप्पल घालणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र, यासाठी त्यांना 15 वर्षे वाट पाहावी लागली.
महत्वाचे म्हणजे दुर्गालाल हे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे समर्थक आहेत. अखेर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी किरार यांना बूट घालायला देत शपथ पूर्ण केली.
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंत्र्यांना सक्त ताकीद देत स्वत:ला कार्यकर्त्यांपेक्षा वरचे असल्याचे समजू नये. कोणत्याही कार्यकर्त्याला मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना भेटायचे असल्यास त्याला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पाहायला लावले तर त्या नेत्याला बाहेरची वाच दाखवायला राहुल गांधी मागेपुढे पाहणार नाहीत.
पायात चप्पल न घालण्याच्या शपथा घेण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता. त्यानंतर राणेंचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ अरविंद भोसले यांनी केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत राणे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला होता. यानंतर भोसले चप्पल घातली होती.