ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 3 - हरियाणामधील अन्न आणि पुरवठा विभागात काम करणा-या महिला कर्मचा-यांनी मंगळवारी जेव्हा व्हॉट्सअॅप चेक केलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपल्या विभागाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अधिका-याने शेअर केलेला पॉर्न व्हिडीओ पाहून महिला अधिका-यांना नेमकं काय चालू आहे तेच कळेनासं झालं. यानंतर ही गोष्ट परसत गेली आणि सगळीकडे चर्चा सुरु झाली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा पॉर्न व्हिडीओ एका वरिष्ठ अधिका-याच्या नंबरवरुन शेअर झाला होता. महिला अधिका-यांना पॉर्न व्हिडीओ शेअर होत असल्याची माहिती मिळतात एक एक करुन सर्वांनी ग्रुप सोडण्यास सुरुवात केली.
ज्या अधिका-याच्या नंबरवरुन हा व्हिडीओ अपलोड झाला होता त्याने माहिती मिळताच माफी मागितली. हा व्हॉट्सअॅप ग्रुप कार्यालयातील कामकाजासाठी तयार करण्यात आला असून यामध्ये मुख्यालयातील कर्मचा-यांव्यतिरिक्त जिल्हास्तरीय अधिकारीही आहेत. या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या कामाचे अपडेट्स देत असतो.