मुंबई : देशातील पहिली खासगी तत्त्वावरील दिल्ली ते लखनऊ तेजस एक्स्प्रेस सुरू झाली आहे. या एक्स्प्रेसचे तिकीट दर इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत जादा आहे. यातून प्रवाशांची लूट सुरू आहे. ही एक्स्प्रेस वेळेत पोहोचविण्यासाठी इतर एक्स्प्रेस थांबविल्या गेल्याने, त्या गाड्यांतील प्रवाशांचा प्रवास अवेळी होतो. परिणामी, पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली खासगी तत्त्वावरील मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसची स्थिती अशीच असणार आहे. त्यामुळे दिखाऊ बाबी दाखवून रेल्वेमंत्री प्रवाशांची दिशाभूल करत असल्याचे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मंगळवारी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने ‘रेल बचाओ संगोष्ठी’चे आयोजन केले होते. यात रेल्वे कॉलनीची विक्री, रेल्वेच्या जागेची विक्री, खासगीकरण या विषयावर आवाज उठविण्यात आला.
राकेश मोहन कमिटीच्या शिफारसीनुसार, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे रुळावर ८० टक्के भार नसावा. मात्र, दिल्ली ते लखनऊ दरम्यान तेजस एक्स्प्रेसमुळे इतर एक्स्प्रेला थांबा दिला जातो. परिणामी, येथील रुळावर १८० टक्केपेक्षा जास्त रेल्वे रुळावर भार दिला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. येत्या दोन दिवसांत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन खासगीकरणावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर, ठोस निर्णय न झाल्यास पुढील कार्यवाही केली जाईल, असे मत रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर यांनी व्यक्त केले.
खासगी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या एक्स्प्रेसमुळे भारतीय रेल्वेच्या एक्स्प्रेसला विलंब होणार आहे. दिल्ली ते लखनऊ मार्गावर धावणाºया तेजस एक्स्प्रेसमुळे एक तास डिझेलवर धावणाºया गाडीला विलंब झाल्यास ३७ हजार रुपयांचे नुकसान होते, तर विद्युत गाडीला एक तास उशीर झाल्यास १६ हजार रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भारतीय रेल्वेचे नुकसान होत आहे, असे मत संघाच्या वतीने मांडण्यात आले.
सलग आठवडाभर शताब्दी, तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशी लागलेले ब्रेड आढळून आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना विषबाधा झाली. त्यामुळे जेवणाची सेवा नीट देऊ शकत नसलेली इंडियन कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) एक्स्प्रेस कशा चालविणार, असा सवाल सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने उचलण्यात आला. करमळी ते गोवा तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी मिक्स भाजी खाल्ल्याने त्यांना उलटी झाली. शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बुरशीयुक्त ब्रेड देण्याची घटना घडली, तर जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनादेखील बुरशीयुक्त ब्रेड देण्यात येण्याचा प्रकार घडला. आयआरसीटीसीने एक्स्प्रेसमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी कंत्राटदारांना नेमले आहेत. मात्र, सलग आठवडाभर बुरशीयुक्त आणि अयोग्य अन्नपदार्थ दिल्याने प्रवाशांची प्रकृती खालावल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे कंत्राटदारांमार्फत संपूर्ण तेजस एक्स्प्रेस चालविण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी भूमिका संघाच्या वतीने मांडण्यात आली.
खासगी तत्त्वावर चालविण्यात येणाºया मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसमुळे इतर एक्स्प्रेस आणि लोकलवर परिणाम होणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील दररोज २१ मेल, एक्स्प्रेस आणि १०पेक्षा जास्त उपनगरीय लोकलला फटका बसणार आहे, अशी माहिती संघाच्या वतीने देण्यात आली.प्रवाशांना झाली होती विषबाधासलग आठवडाभर शताब्दी, तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बुरशी लागलेले ब्रेड आढळून आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना विषबाधा झाली. त्यामुळे जेवणाची सेवा नीट देऊ शकत नसलेली इंडियन कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) एक्स्प्रेस कशा चालविणार, असा सवाल सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने उचलण्यात आला.