Opinion polls: आंध्र, केरळ, तामिळनाडू, दक्षिणेतील राज्ये मोदींचा खेळ बिघडवणार, काँग्रेसला हात देणार, समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:05 PM2022-07-29T20:05:28+5:302022-07-29T20:08:01+5:30

Opinion polls: या टीव्ही-मॅटराईजच्या ओपिनियन पोलमधून दक्षिण भारतात भाजपाची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यात मिळून भाजपाला केवळ एक जागा मिळू शकते असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. 

Andhra, Kerala, Tamil Nadu, Southern states will spoil Modi's game, statistics have come out | Opinion polls: आंध्र, केरळ, तामिळनाडू, दक्षिणेतील राज्ये मोदींचा खेळ बिघडवणार, काँग्रेसला हात देणार, समोर आली अशी आकडेवारी

Opinion polls: आंध्र, केरळ, तामिळनाडू, दक्षिणेतील राज्ये मोदींचा खेळ बिघडवणार, काँग्रेसला हात देणार, समोर आली अशी आकडेवारी

googlenewsNext

नवी दिल्ली - २०१४ आणि २०१९ ची लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आता मोदींनी २०२४ ची निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मोदी आणि भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, मोदींच्या या दिग्विजयामध्ये दक्षिण भारतातून मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. आज आलेल्या इंडिया टीव्ही-मॅटराईजच्या ओपिनियन पोलमधून दक्षिण भारतात भाजपाची डोकेदुखी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यात मिळून भाजपाला केवळ एक जागा मिळू शकते असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. 

इंडिया टीव्ही-मॅटराईजच्या ओपिनियन पोलनुसार दक्षिणेतील आंध्र प्रदेशमध्ये २५ जागांपैकी १९ जागा वायएसआर काँग्रेस तर ६ जागा टीडीपीला मिळण्याची शक्यता आहे. तर या राज्यात भाजपाला भोपळाही फोडता येणार नाही. तर केरळमध्ये २० जागांपैकी २० जागा ह्या काँग्रेस आघाडीला मिळतील, असा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर तामिळनाडूमध्येही भाजपाला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये ३९ जागांपैकी ३८ जागा ह्या काँग्रेस द्रमुक आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, असं असली तरी इंडिया टीव्ही-मॅटराईजच्या सर्वेमधून सर्व राजकीय अंदाजांना धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा आज निवडणुका झाल्यास सर्व रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार आज निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ९७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना ८४ जागा मिळण्याची शक्यता आहे.    

Web Title: Andhra, Kerala, Tamil Nadu, Southern states will spoil Modi's game, statistics have come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.