ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - आंध्र प्रदेश आणि ओडिशाला येत्या 48 तासांत चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांच्या समुद्रकिना-यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. ओडिशा सरकारनं 14 जिल्ह्यांत हाय अलर्ट जारी केलं आहे. चक्रीवादळ पहिल्यांदा आंध्र प्रदेशच्या समुद्रकिना-यावर धडकण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मच्छीमारांनाही आठवड्याभरात समुद्रात उतरू नका, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. हे चक्रीवादळ प्रतितास 45 ते 50 किलोमीटर वेगानं पुढे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशात पाऊस पडण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशासह विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, पुरी, गजापती, गंजम, गोपालपूर, पूर्व गोदावरीवरही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशाला चक्रीवादळाचा इशारा
By admin | Published: October 26, 2016 7:11 PM