ऑनलाइन लोकमत
अनंतपूरम, दि. 28 - आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर, या दुर्घटनेतील चार जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूरम जिल्ह्यातील गुंटाकाल ब्लॉक येथील एरटिम्मा राजू तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप चार जण बेपत्ता असल्याचे समजते. दरम्यान, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच, बेपत्ता असलेल्यांची आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अद्याप मिळालेली नाहीत.
डेक्कन हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या गावातील मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. यावेळी 20 लोक या बोटीत प्रवास करत होते. त्यातील 13 जण हे एकाच कुटुंबातील होते.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून संबंधित जिल्हातील अधिका-यांना बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
13 people drown in a stream in #Anantapuramu district of #AndhraPradesh as #BoatCapsizes; 4 more missing: Police.— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2017
सविस्तर वृत्त लवकरच...