तिरुपती : आंध्र प्रदेशला बहुधा चार राजधानींची शहरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे या चार शहरांची नावे जाहीर करणार हे रविवारी उघड झाल्यावर सध्या राज्याची राजधानी अमरावती हलवली जाणार या चर्चेला सुरुवातझाली.
सत्ताधारी वाय. एस. आर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (तेदेप) यांच्यात नव्या राजधानीच्या बांधकामावरून संघर्ष सुरू असताना भाजपचे खासदार टी. जी. वंकटेश म्हणाले की, रेड्डी यांनी अमरावती शहर राज्याच्या राजधानीचा मान गमावणार असल्याचे आधीच केंद्र सरकारला कळवले आहे. गोदावरी नदीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळवण्यास मान्यता दिल्याबद्दल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर वेंकटेश यांनी टीका केली. ते म्हणाले, जे लोक राव यांच्या योजनेसोबत असतील ते उद्ध्वस्त होतील. (वृत्तसंस्था)विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापारेड्डी हे विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापा या शहरांत राजधानी स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचे वेंकटेश म्हणाले. ते रविवारी कुर्नूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.अमरावती हा विकासासाठी फ्री झोन बनवावा, सत्तेचे विकेंद्रीकरण करावे, उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना इतर भागांतही करावी, असे आवाहन आम्ही याआधीच जगन रेड्डी यांना केले होते, असे सांगून चार शहरांत राजधानीच्या विचारांचे लोक स्वागत करतील, असे ते म्हणाले.