"पक्षाच्या नावातून 'वायएसआर' आणि 'काँग्रेस' ...", काँग्रेसने जगन मोहन रेड्डी यांना आव्हान दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:09 PM2023-12-16T13:09:11+5:302023-12-16T13:10:55+5:30

पुढील वर्षी आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

andhra pradesh congress chief rudra raju dares criticized on cm jagan mohan reddy | "पक्षाच्या नावातून 'वायएसआर' आणि 'काँग्रेस' ...", काँग्रेसने जगन मोहन रेड्डी यांना आव्हान दिले

"पक्षाच्या नावातून 'वायएसआर' आणि 'काँग्रेस' ...", काँग्रेसने जगन मोहन रेड्डी यांना आव्हान दिले

आंध्रप्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने यासाठी मोठी तयारी केली आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिदुगु रुद्र राजू यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आव्हान दिले आहे. बोलताना गिदुगु रुद्र राजू म्हणाले की, "पक्ष पुढील ७० दिवसांत आपली निवडणूक रणनीती अंमलात आणेल. ही रणनीती पक्षाच्या राजकीय घडामोडी आणि सह-संघटनांद्वारे तयार केली जाईल. समन्वय समितीने तीन दिवसांच्या बैठकीत तयारी केली आहे.

'सागरला संसदेबाहेर स्वत:ला पेटवून घ्यायचे होते', पोलिस चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा

"२० जानेवारीपासून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या 'इंटिंटा काँग्रेस' उपक्रमाचा एक भाग म्हणून घरोघरी प्रचार करतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी स्थापना दिनानिमित्त २९ डिसेंबर रोजी काकीनाडा येथे शताब्दी सोहळा होणार आहे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना आव्हान दिले 

गिदुगु रुद्र राजू म्हणाले, "काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्ष नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याने पक्षाचे वातावरण उत्साहवर्धक आहे. आम्ही व्यापक प्रचारासाठी तयार आहोत." "तुम्ही तुमच्या पक्षाच्या नावातून 'वायएसआर' आणि 'काँग्रेस' हे दोन शब्द काढून टाका आणि नंतर आगामी निवडणुकीत जनतेकडून जनादेश घ्या. ही दोन्ही नावे काँग्रेस पक्षाची आहेत, असं आव्हान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना दिले. "जगन यांनी राज्यातील लोकांमध्ये व्यापक मान्यता असलेले दोन शब्द वापरून सत्ता काबीज केली आहे. मी त्यांना आव्हान देतो की, हे शब्द सोडा आणि मग लोकांकडे जाऊन मतं मागा, असंही ते म्हणाले.

रुद्र राजू म्हणाले, "राज्यातील लोकांसमोर वास्तव समोर येत आहे आणि त्यांना हे समजू लागले आहे की जगन मोहन रेड्डी हे दिवंगत वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे खरे राजकीय वारसदार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. “लोकांनी टीडीपी आणि वायएसआरसीपी या दोघांचे खरे रंग पाहिले आहेत. टीडीपीने राज्यात पाच वर्षे राज्य केले पण केंद्रातील भाजप सरकारच्या उदासीनतेला बळी पडलेल्या लोकांचे हाल दूर करण्यासाठी ठोस काहीही केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: andhra pradesh congress chief rudra raju dares criticized on cm jagan mohan reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.