हैदराबाद - आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मरेदुमिल्ली आणि चिंतूरूदरम्यान हा भीषण अपघात झाला.
आंध्र प्रदेशमधील मरेदुमिल्लीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड सीमेवर असणाऱ्या राजमुंदरी या आदिवासी भागातून काही पर्यटक चिंतूरूकडे जात होते. त्याच दरम्यान दुपारी दोन वाजता घाटम रोडवरील वाल्मिकी कोंडा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती पोलीस आणि घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (15 ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये जवळपास 20 ते 25 प्रवासी होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उत्तराखंडमध्येही सोमवारी रात्री कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील यमनोत्री नॅशनल हायवेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू झाले. मात्र अंधार असल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. याआधी देखील रविवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एक जीप दरीत कोसळली होती. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर 5 जण जखमी झाले होते.