हैदराबाद- आम्हाला विशेष दर्जा द्या, पूरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्या अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करत असतात. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळामधील सदस्यांनी मात्र करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरुच ठेवली आहे. आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री यनमाला रामकृष्णूडू यांनी दातांवरील उपचारांसाठी थेट सिंगापूर गाठले आणि करदात्यांच्या पैशातून 2.88 लाख रुपये खर्च करुन ते परतले. राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता त्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर्षी 12 एप्रिल रोजी रामकृष्णुडू यांनी सिंगापूरमधील अझुर डेंटल येथे रुट कनाल उपचार घेतले. या उपचारासांठी लागलेले सर्व पैसे त्यांना 23 ऑगस्ट रोजी राज्याच्या डॉ. एनटीआर विद्या सेवा ट्रस्ट आरोग्यविभागाने देऊन टाकले. जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने ऑर्डर क्रमांक 1844 नुसार हे पैसे देऊन टाकले. या विभागाचे सचिव श्रीकांत नागुलापल्ली यांनी या ऑर्डरसाठी अर्थ मंत्रालयाच्या कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. हे पैसे आता मंत्रिमहोदयांच्या पगाराच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.
करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग; आंध्र प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये घेतले दंतोपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 1:32 PM