Andhra Pradesh: अब कंडोम के पैकेट पर भी चुनावी प्रचार, इन दो पार्टियों पर लगा घर-घर बंटवाने का आरोपचुनाव के पहले शराब, पैसे और महिलाओं को साड़ियां बांटना तो आम है. लेकिन अब आंध्र प्रदेश में सियासी दलों ने घर-घर कंडोम के पैकेट बांटने शुरू कर दिए हैं. इसके लिए बकायदा कंडोम के पैकेट के ऊपर पार्टी का चुनाव चिन्ह और नाम भी छापा गया है.
Andhra Pradesh News : निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष काय काय करतात...मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून पैसे, दारू आणि साड्या आणि शिलाई मशीनचे वाटप सर्रास झालेले आपण पाहिले आहे. पण, आता या यादीत 'कंडोम'चाही समावेश झालाय. हा अजब कारनामा आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आला आहे. राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर पक्षाचे चिन्ह आणि नाव छापून घरोघरी वाटले. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
घरोघरी कंडोमचे वाटपलोकसभानिवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष विविध पद्धतीने प्रचार करत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमध्ये प्रचाराची अनोखी पद्धत पाहायला मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वायएसआर काँग्रेस (YSR congress) आणि प्रमुख विरोधी पक्ष टीडीपी (TDP) चे कार्यकर्ते निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव असलेली कंडोमची पाकिटे वाटताना दिसत आहेत.
दोन्ही पक्षांची एकमेकांवर टीका पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन कंडोमचे वाटप करत असल्याचे पाहून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाने टिडीपीवर टीका करताना म्हटले की, तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार? निवडणूक प्रचारासाठी आता कंडोमचे वाटप, पुढे जाऊन व्हायग्रा वाटप सुरू करणार का? असा सवाल त्यांनी केला. तर, टीडीपीनेही वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.