शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

जगन मोहन रेड्डी यांची आई आणि बहिणीविरोधात कोर्टात धाव, जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 6:35 PM

Andhra Pradesh: गेल्या काही काळापासून जगन मोहन रेड्डी यांच्या घरात वाद सुरू आहे.

Andhra Pradesh Politics : आंध्र प्रदशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वायएस शर्मिला यांच्यात एका कंपनीच्या शेअर्सच्या हस्तांतरणावरून पुन्हा एकदा वाद झाला आहे. दरम्यान, वायएस शर्मिला यांनी जगन मोहन यांना पत्र लिहिले आहे. सप्टेंबर 2024 रोजी लिहिलेल्या पत्रात शर्मिला यांनी त्यांचे दिवंगत वडील वायएस राजशेखर रेड्डी (वायएसआर) यांच्या सूचनांचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “हे लक्षात ठेवा की, वडिलांनी त्यांच्या हयातीत कौटुंबिक संसाधनांमधून मिळवलेल्या सर्व कौटुंबिक मालमत्ता चार नातवंडांमध्ये समान रीतीने विभागल्या पाहिजेत, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावेळी तू वडिलांशी सहमत होतास आणि त्यांच्या शब्दाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता त्यांच्या मृत्यूनंतर तू ते वचन पाळण्यास नकार देत आहेस."

वायएस शर्मिला यांनी पत्रात यावर भर दिला की, तिची दोन्ही मुले साक्षी मीडिया ग्रुप, भारती सिमेंट्स आणि इतर व्यवसायांवरदेखील अधिकार ठेवू शकतात. कारण या मालमत्ता त्यांच्या वडिलांच्या हयातीत कौटुंबिक संसाधनांमधून विकत घेतल्या गेल्या होत्या. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे लिहिले की, माझा आणि माझ्या मुलांचा या मालमत्तांवर हक्क आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”

जगनचे उत्तरः ही स्व-अधिग्रहित मालमत्ताजगन मोहन रेड्डी यांनी ऑगस्ट 2024 मध्ये शर्मिला यांना एक पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हयातीत सर्व मालमत्तांचे वाटप केले होते. जगन मोहन रेड्डी म्हणाले होते, “वडिलांनी त्यांच्या हयातीत खरेदी केलेल्या सर्व संपत्तीचे वितरण केले होते. याशिवाय, मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने आणि भांडवलाने अनेक व्यवसाय स्थापन केले आहेत, ज्यांचा कोणत्याही कौटुंबिक मालमत्तेशी संबंध नाही. आपल्या बहिणीवरील प्रेम आणि आपुलकीमुळे त्याने काही मालमत्ता तिच्या नावावर करण्याची योजना आखली होती." जगन मोहन रेड्डी यांनी असेही स्पष्ट केले होते की, वायएस शर्मिला यांना गेल्या दशकात सुमारे 200 कोटी रुपये दिले गेले आहेत, जे त्यांच्या आई विजयम्मा यांच्यामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिले गेले. 

बहीण आणि आईविरोधात कोर्टात धाव जगन यांनी बहीण आणि आईविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये याचिका दाखल केली. हे प्रकरण सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमधील शेअर्सच्या वाटपाशी संबंधित आहे. यामध्ये जगन आणि त्यांची पत्नी वायएस भारती यांनी 2019 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानंतर शेअर्सच्या वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. जगन मोहन रेड्डी यांचा दावा आहे की ही संपत्ती स्व-अधिग्रहित आहे आणि ती त्यांच्या वडिलांनी सोडलेल्या वारसाचा भाग नाही. तर, शर्मिला आणि तिची आई विजयम्मा वडिलांच्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी करावी असा आग्रह धरत आहेत. एनसीएलटीने या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर 2024 रोजी निश्चित केली आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशCourtन्यायालय