शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
2
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
3
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
4
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
5
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
6
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
7
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
8
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
9
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
10
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
11
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
12
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
14
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
15
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
16
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
17
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
18
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
19
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
20
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?

शाळा बंद, रेल्वे रद्द...! तेलंगणा-आंध्रमध्ये पावसाचा कहर, पंतप्रधान मोदी यांचं मुख्यमंत्र्यांना मदतीचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 8:31 AM

AP Telangana Flood : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे.

Telangana-Andhra Pradesh Flood : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित आणि वित्तहानी, तसेच मोठ्या प्रमाणावर जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना उधाण आले आहे. हैदराबाद आणि विजयवाडा सारख्या शहरांसह बराच मोठा भाग पाण्याखाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तातडीच्या बैठका घेतल्या. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्यांशी संवाध साधला असून त्यांना केंद्राकडून संपूर्ण मदत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय, स्थानिक परिस्थितीनुसार 2 सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. रेल्वेचा विचा करता, दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने 99 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच चार गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर 54 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

नरेंद्र मोदींनी घेतला पूर स्थितीचा आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधून अतिवृष्टी आणि पूर स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, या दोन्ही राज्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तेलंगानामध्ये 9 जणांचा मृत्यू तेलंगणामध्ये पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. रविवारी हैदराबादसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नाले भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यामुळे गावा गावांतील रस्त्यांद्वारे होणारा संपर्क विस्कळीत झाला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या.

टॅग्स :floodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू