विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशामधील विशाखापट्टणम पुन्हा एकदा वायू गळतीमुळे हादरल्याची घटना समोर आली आहे. औषधं तयार करणाऱ्या कंपनीत वायू गळती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वायू गळतीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणममधील सैनोर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वायू गळती झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून चार कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडली असून यामध्ये बेंझिमिडाझोल हा विषारी वायू लीक झाला. त्याच दरम्यान कंपनीत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना त्रास सुरू झाला. घटनेचा माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणममध्ये अशीच एक वायू गळतीची घटना समोर आली होती. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता.
विशाखापट्टणम येथे गुरुवारी (7 मे) विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गॅस गळतीमुळे शहरात 11 जणांचा मृत्यू झाला. 300 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच 5 हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले होते. 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली होती. या गॅसगळतीची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा विशाखापट्टणम वायू गळतीच्या घटनेने हादरलं असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संतापजनक! ई-पास मागितला म्हणून नेत्याची दादागिरी, पोलिसाला केली धक्काबुक्की; Video व्हायरल
काय सांगता? कोरोनाच्या संकटात मदत करणार स्मार्ट मास्क; 8 भाषेत ट्रान्सलेट होणार मेसेज, कॉल
अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...
CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी
CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा