विजयवाडा : वायएसआर काँग्रेसमधून बाहेर पडून तेलगू देसममध्ये प्रवेश केलेल्या १३ आमदारांचे सदस्यत्व पक्षांतरबंदी कायद्यान्वये रद्द करण्यास आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष शिवप्रसाद राव यांनी शनिवारी नकार दिला. त्या १३ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी वायएसआय काँग्रेसतर्फे करण्यात आली होती.ज्या नियमान्वये १३ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे, तो इथे लागू होत नाही, असे विधानसभाध्यक्षांनी आदेशात म्हटले आहे. वायएसआर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या १३ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती पक्षप्रतोद एन. अमरनाथ रेड्डी यांनी केली होती, तर नंतर बाहेर पडलेल्या दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, असे पत्र आ. मुस्तफा शेख यांनी दिले होते. (वृत्तसंस्था)
आंध्र प्रदेशच्या ‘त्या’ १३ आमदारांचे सदस्यत्व कायम
By admin | Published: July 03, 2016 1:16 AM