नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानच नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या एका फोटोमुळे नेपाळमध्ये वादाला तोंड फुटले आहे. नव्या संसद भवनामध्ये लावण्यात आलेला हा हा फोटो वास्तवात एक भित्तीचित्र आहे. त्यालाच अखंड भारताचा नकाशा, असं म्हटलं जात आहे. या नकाशामध्ये गौतम बुद्ध यांचं जन्मस्थान असलेल्या लुंहिनीलाही अखंड भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे नेपाळमधील राजकीय पक्ष संतप्त झाले आहेत.
नेपाळच्या लोकांनी सांगितले की, नव्या संसद भवनामध्ये लागलेल्या भित्तिचित्रामध्ये गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला दाखवल्यामुळे भारत या क्षेत्रावर आपला दावा करत आहे, असं वाटतं. नेपाळ आपल्या मानचित्रामध्ये लुंबिनीला मुख्य सांस्कृतिक केंद्रापैकी एक मानतो.
या भित्तिचित्राबाबत नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराई यांनी एका विधानात सांगितले की, या प्रकारामुळे दोन्ही देशांदरम्यान, विश्वासाची कमतरता निर्मांण होऊ शकते. त्यांनी सांगितले की, भारताच्या नव्या संसद भवनामध्ये अखंड भारताचं वादग्रस्त भित्तिचित्र नेपाळसह शेजारील देशांमध्ये अनावश्यक आणि हानिकारक कुटनीतिक वाद भडकवू शकते. भारताच्या बहुतांश शेजाऱ्यांमध्ये आधीपासूनच विश्वासाची कमतरता आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध खराब होत आहेत. नव्या घटनाक्रमामुळे यात अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्विपक्षीय चर्चा केली होती. तेव्हापासूनच नेपाळी मीडियामध्ये भित्तिचित्राचा मुद्दा चर्चेत आहे. नव्या संसद भवनामधील अखंड भारताच्या भित्तिचित्रावरून पाकिस्तानचीही आग झाली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली आहे. भित्तिचित्राला अखंड भारताशी जोडण्याबाबतच्या एक केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांच्या विधानांमुळे आम्हाला धक्का बसला आहे, असे त्यांनी सांगितले.