चिंतामण गणेश स्टेशनचे नाव उर्दूत लिहिल्याने महंतांचा संताप; एका रात्रीत नाव हटविले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 01:08 PM2021-03-04T13:08:08+5:302021-03-04T13:40:54+5:30
chintaman ganesh temple station : चिंतामण गणेश मंदिर स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने जो फलक लावला आहे, त्यावर हिंदी, इंग्रजीसोबतच उर्दू भाषेतही स्टेशनचे नाव लिहिले.
उज्जैन : मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये तयार करण्यात आलेले नवीन चिंतामन रेल्वे स्टेशन उद्घाटनापूर्वीच चर्चेत आले आहे. या चिंतामन रेल्वे स्टेशनच्या नामफलकावर लिहिलेल्या नावावरून वाद उफळला आहे. (name of chintaman ganesh temple station written in urdu removed at station after controversy erupts in ujjain)
चिंतामण गणेश मंदिर स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने जो फलक लावला आहे, त्यावर हिंदी, इंग्रजीसोबतच उर्दू भाषेतही स्टेशनचे नाव लिहिले. यावरून हा वाद उफाळून आला. मात्र, या वादानंतर आता एका रात्रीत या फलकावरील उर्दू भाषेतील नाव हटविले आहे. पण, ही कारवाई रेल्वे प्रशासनाने केली आहे की, दुसरे कोणी फलकावर पिवळा रंग लावला आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
उज्जैनमधील आवाहन आखाड्याचे महंत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी चिंतामन रेल्वे स्टेशनच्या नामफलकावर उर्दूत नाव लिहिण्याला आक्षेप घेतला होता. जिहादी वृत्तीच्या आणि मुघलांच्या भाषेचा स्वीकार आम्ही करणार नाही, असे म्हणत या नामफलकाचा विरोध केला.तसेच, तो लवकरच बदलावा असे आखाड्याचे महंत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी म्हटले. याशिलाय, उर्दू ही अनैसर्गिक भाषा आहे, त्यामुळे तिचा सार्वजनिक जीवनात वापर करू नये असेही मत आखाड्याचे महंत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, उज्जैन है हिंदू धर्माचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. महाकालेश्वर शंकरांचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक याठिकाणी येत असतात. हे दर्शन झाल्यावर बहुतांश भाविक 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतामण गणेश मंदिरात जाऊन गणपतीबाप्पाचे दर्शन घेतात.
नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात आले
उज्जैनहून फातियाबादला जाणारी नॅरो गेज रेल्वे लाइन रेल्वे प्रशासनाने आधीच बंद केली होती. त्यानंतर त्याच मार्गावर ब्रॉड गेज लाइन टाकण्यात आली. याच मार्गावर असलेल्या चिंतामण गणेश मंदिरात भाविक जातात म्हणून त्या मंदिरासमोर रेल्वे स्टेशन उभारण्यात आलं आहे. उज्जैन फातियाबाद मार्गावरील हे पहिलं स्टेशन आहे. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण 6 किलोमीटरवर आहे.