शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

महागात पडणार अपक्षांची नाराजी

By admin | Published: July 08, 2015 11:45 PM

अग्निशमनवरुन घमासान : परिषदेच्या निवडणुकीत वचपा काढणारनागपूर : सभापतीपदाच्या निवडणुकीत डावलल्यास डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनपातील अपक्ष व छोट्या घटक पक्षाचे १५ नगरसेवक नागपूर विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. ही नाराजी आघाडीला महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.१० जुलैला समितीच्या सभापतींची निवड केली जाणार ...


अग्निशमनवरुन घमासान : परिषदेच्या निवडणुकीत वचपा काढणार
नागपूर : सभापतीपदाच्या निवडणुकीत डावलल्यास डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनपातील अपक्ष व छोट्या घटक पक्षाचे १५ नगरसेवक नागपूर विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. ही नाराजी आघाडीला महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१० जुलैला समितीच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. यात सभापतींची नावे गुरुवारी निश्चित केली जाणार आहे. परंतु अग्निशमन समितीसाठी किशोर डोरले यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना सभापतीपद न मिळाल्यास ते अपक्षासह आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अपक्ष नगरसेवक आघाडीतून बाहेर पडल्यास भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेची पुनरावृत्ती मनपात होण्याची शक्यता आहे. मनपातील काही पदाधिकारी वगळता भाजपचे नगरसेवक व कार्यक त्यांर्त नाराजी असतानाच सभापतीपदाच्या मोर्चेबांधणीत काही नेत्यांचाही हस्तक्षेप केल्याने यात पुन्हा भर पडली आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु मनपातील नेत्यांनी यातून बोध घेतलेला दिसत नाही. अपक्ष नगरसेवकांच्या गटाला अग्निशमन व क्रीडा समिती देण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही ओमप्रकाश यादव यांची सभापतिपदी निवड केली जाणार आहे. वास्तविक त्यांची आधीच ४०० कोटीच्या महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे डोरले यांचा पत्ता कापल्यास निवडणुकीत बंडखोरी अटळ असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)
चौकट..
गटबाजीमुळे नगरसेवक त्रस्त
मनपातील नागपूर विकास आघाडीतील गटबाजी व काही नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप यामुळे भाजपचे नगरसेवक त्रस्त आहेत. दुसरीकडे मोठे नेते मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करण्यात व्यस्त असल्याने आपली व्यथा कुणाकडे मांडावी. असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. यातून सत्तापक्षात नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.