शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग, तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी फेडरल फ्रंट गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:54 AM

विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागताना दिसत आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या अन्य चार मुख्यमंत्र्यांसह काम करायला नकार दिला आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागताना दिसत आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या अन्य चार मुख्यमंत्र्यांसह काम करायला नकार दिला आहे.चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक नेत्यांना घेऊन भाजपेतर व काँग्रेसेतर आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. एन. चंद्रबाबू नायडू एच. डी. कुमारस्वामी, पिनराई विजयन व ममता बॅनर्जी या चार मुख्यमंत्र्यांनी रविवारी महत्वाच्या विषयांवर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या चौघांना पाठिंबा नसल्याचे सांगायलाही केसीआर यांनी नकार दिला. पटनाईक भाजप व काँग्रेसपासून दूरच आहेत. केसीआर यांच्या फेडरल फ्रंटच्या कल्पनेलाही त्यांनी पाठिंबा दाखवला नव्हता.चार मुख्यमंत्र्यांसोबत चंद्रशेखर राव नाहीत हे पाहून भाजपचे हृदय आनंदाने भरून आले असावे. काँग्रेसचे अन्य मुख्यमंत्रीही या चौघांपासून चार हात दूरच राहिले. काँग्रेसने हे का केले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.बंगळुरूतील कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ््यालाही केसीआर गैरहजर राहिले. परंतु, यावेळी केसीआर दिल्लीत उपस्थित असूनही चार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैैरहजर राहिले, हे आश्चर्यजनक आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळेच विरोधकांत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.