संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:52 AM2021-05-31T08:52:55+5:302021-05-31T08:53:59+5:30

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले.

Angry Congress spokespersons supriya sunailt angry at the characters concerned, harsh criticism | संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द

संबित पात्रांवर संतापल्या काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या, लाईव्ह डिबेटमध्ये वापरले अपशब्द

Next
ठळक मुद्देचीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता. त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याची आठवण करुन दिली.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखाच सोशल मीडियावरुन मांडला आहे. मोदी सरकाने किती पारदर्शी आणि विकासात्मक काम केल्याचं भाजपाने म्हटले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही मोदींच्या 7 वर्षीय वाटचालीतील विकासाची घोडदौड सोशल मीडियातून सांगितली आहे. तसेच, न्यूज वृत्त वाहिन्यांमध्येही डिबेट शो सुरू होते. एका डिबेट शोमध्ये संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. 

काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. मोदी सरकार चीनचं नाव घ्यायलाही घाबरते, पण इंदिरा गांधींनी जगाचा नकाशा बदलून पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचं सुप्रिया यांनी म्हटलं. सुप्रिया यांच्या या वक्तव्यानंतर संबित पात्रा चांगलेच संतापले अन् दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक संघर्ष सुरू झाला. 

चीन आणि डोकलाम मुद्द्यांवरुन चांगलाच वादविवाद रंगला होता. त्यावेळी, संबित पात्रा यांनी 2008 साली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चीनला जाऊन सह्या केल्याची आठवण करुन दिली. त्यावेळी, किती रुपयाची घेवाण-देवाण झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वाद सुरू होता. त्यावेळी, सुप्रिया यांनी संबित पात्रा यांना जोकरपंती करतात, असे संबोधले. त्यामुळे, राहुल गांधींचं नाव का घेता, राहुल गांधींना हटवा, असे संबित पात्रा यांनी म्हटले. त्यावर, श्रीनेत चांगल्याच संतापल्या व त्यांनी संबित पात्रा यांना गटारातला किडा म्हणत त्यांच्यावर टीका केली.

Web Title: Angry Congress spokespersons supriya sunailt angry at the characters concerned, harsh criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.