बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:37 PM2021-12-07T15:37:31+5:302021-12-07T15:50:05+5:30

नाराज झालेल्या 17 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

angry with father in gwalior son swallowed 27 nails removed after two and half hours operation | बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही...

बापरे! वडील ओरडल्याने एकुलत्या एका मुलाने गिळले तब्बल 27 खिळे; मग झालं असं काही...

Next

नवी दिल्ली - आई-वडील अनेकदा मुलांना ओरडतात. मुलांच्या चांगल्यासाठी तो ओरडा गरजेचा देखील असतो. पण यामुळे काही वेळा मुलं नाराज होतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. वडील ओरडल्यामुळे नाराज झालेल्या मुलाने तब्बल 27 खिळे गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील मुरार येथे ही घटना घडली. नाराज झालेल्या 17 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलाच्या पोटात दुखू लागल्याने त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मुलाचा वाढता त्रास लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. अडीच तासांच्या ऑपरेशननंतर मुलाच्या पोटातील खिळे काढण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉ. वीरेंद्र माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरार येथील रहिवासी असलेले एसआरएफ जवान सत्यपाल यांचा एकुलता एक मुलगा धनंजय याने 21 दिवसांपूर्वी खिळे गिळले होते. धनंजयने चुकून तीन इंचाचे 27 खिळे जेवताना गिळले असं सांगितलं जात आहे.

अडीच तास करण्यात आली शस्त्रक्रिया 

मुलाच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे वडिलांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. आठ दिवस उपचार सुरू असताना पोटात खिळे असल्याचे तपासणीत आढळून आले, मात्र ऑपरेशन होऊ शकले नाही. त्यानंतर लक्ष्मीबाईच्या येथील रुग्णालयात आणण्यात आले. शुक्रवारी मुलाला दाखल करण्यात आले आणि रविवारी डॉ. श्वेता माहेश्वरी यांच्यासमवेत सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरच पोटातून 27 खिळे बाहेर काढता आले. आता धनंजयची प्रकृती ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: angry with father in gwalior son swallowed 27 nails removed after two and half hours operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.