शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संतप्त जमावाने ड्रग्स तस्कर तरूणाचे हात,पाय कापले

By admin | Published: June 10, 2017 6:14 AM

पंजाबच्या भटिंडामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणा-या तरूणाचे हात आणि पाय कापल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
भटिंडा, दि.10 -पंजाबच्या भटिंडामध्ये अंमली पदार्थाची विक्री करणा-या तरूणाचे हात आणि पाय कापल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. रूग्णालयात दाखल केल्यानंतर या तरूणाचा मृत्यू झाला. विनोद कुमार (वय-25) असं मृत तरूणाचं नाव आहे. 
 
विनोद कुमार हा त्याच्या गावी आला असताना जमावाने त्याच्यावर हल्ला केला.  जमावातील काही जणांनी हे भयावह दृष्य आपल्या मोबाइल कॅमे-यामध्येही शूट केलं आहे. 
 
विनोद कुमारला  अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी अटक झाली होती आणि तीन ते चार दिवसांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती, अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदिश कुमार यांनी दिली. येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात तक्रारी करुनही पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने गावातील जमाव आक्रमक झाला होता. त्यामुळेच लोकांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विनोद कुमारला जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता प्रक्षुब्ध जमावाने त्याचे हात आणि पाय कापले. त्यानंतर पोलिसांनी जमावाच्या तावडीतून विनोदची सुटका केली आणि त्याला फरीदकोटमधील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला.   
 
पंजाबमध्ये अंमली पदार्थ ही मोठी समस्या बनली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही सर्वच पक्षांनी या मुद्द्यावरून रान उठवलं होतं. बेरोजगारीमुळे पंजाबमधील बहुसंख्य तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. 
 
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.