अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 02:51 PM2019-01-02T14:51:23+5:302019-01-02T14:52:11+5:30

ऑडिओ क्लीपवरून अनिल अंबानी यांचे नाव राहुल गांधी यांनी घेताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना रोखले.

Anil Ambani's name ban on Parliament ... Rahul Gandhi's RENAme then see ... | अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा...

अनिल अंबानींचे नाव घेण्यावर संसदेत बंदी...राहुल गांधींनी मग काय नाव ठेवले पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली : राफेल डीलच्या फाईल गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याच्या ऑडिओ क्लीपवरून अनिल अंबानी यांचे नाव राहुल गांधी यांनी घेताच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना रोखले. अनिल अंबानी हे संसदेचे सदस्य नसून त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे सांगताच राहुल यांनी अंबानी भाजपचे सदस्य नाहीत का, असा प्रश्न विचारला. यावरून झालेल्या गदारोळानंतर 8 मिनिटांसाठी कामकाज थांबविण्यात आले. 


यानंतर राहुल गांधी पुन्हा बोलायला लागल्यावर त्यांनी अनिल अंबानी यांचे नाव भाजपच्या शैलीत ठेवले. अनिल अंबानींचे नाव घेऊ शकत नाही, पण त्यांना ''डबल ए'' तर म्हणू शकतो, असे सांगताच संसदेत एकच हशा पिकला. यानंतर राहुल गांधी यांनी पर्रीकर यांचा उल्लेख करताना गोव्याचे मुख्यमंत्री म्हटले यावरही अध्यक्षा महाजन यांनी आक्षेप घेतला. इथे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा संबंध नसून संरक्षण मंत्र्यांचा आहे. यामुळे गोवा मुख्यमंत्री म्हणू नये. 




यावर राहूल गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री असा उल्लेख करत पर्रीकरांकडे राफेलशी संबंधीत पुरावे असल्याचा आरोप केला. तसेच कालच्या मुलाखतीवेळी मोदी घाबरलेले होते असा आरोपही केला. 


 



 

Web Title: Anil Ambani's name ban on Parliament ... Rahul Gandhi's RENAme then see ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.