नवी दिल्ली: गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना महिन्याकाठी १०० कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करून मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. आता परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी याचिकेत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. (Anil Deshmukh Wanted To Frame Bjp Leaders in mohan delkar case param bir singh in petition to supreme court)१०० कोटींच्या टार्गेटबाबत गृहमंत्र्यांवर झालेले आरोप न पटणारे: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं कारणगृहमंत्री अनिल देशमुख दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अडकवू पाहत होते, असा आरोप सिंह यांच्या वतीनं दाखल केल्या गेलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. माझी बदली मनमानीपणे करण्यात आली असून ती बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. राज्य, केंद्र सरकार आणि सीबीआयला देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तातडीनं ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे.रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा'भाजप नेत्यांना अडकवण्याचं प्रयत्न'अनिल देशमुख विविध प्रकरणांच्या तपासात हस्तक्षेप करत होते, असा आरोप सिंग यांनी याचिकेत केला आहे. माझ्याकडून देण्यात येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करा, असं देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना सांगायचे. अपक्ष खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातदेखील हेच झालं. या प्रकरणात देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांना अडकवायचं होतं, असं सिंग यांनी याचिकेत नमूद केलं आहे.डेलकर यांचा मृतदेह २२ फेब्रुवारीला मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये सापडला. त्यांनी १५ पानांचं एक पत्र आत्महत्येपूर्वी लिहिलं होतं. या प्रकरणात आम्ही तपासाला सुरुवात केली आणि पोलीस विभागाच्या लीगल सेलचा सल्ला घेतला, असं सिंग यांनी याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणात भाजपच्या नेत्यांना गोवण्यासाठी गृहमंत्र्यांनी दबाव आणला होता. मात्र आम्ही दबावाला बळी पडलो नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.